मूळ हिंदी गीत: इंदीवर, संगीत: रोशन, गायक: मुकेश
चित्रपट: अनोखी अदा, भूमिका: संजीव कुमार, झाहीदा
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६११२५
धृ
|
ओ हा, खैर है, खैर है, खैर है ओहो रे ताल मिले नदी के जल में नदी मिले सागर में सागर मिले कोनसे जल में? कोई जाने ना
|
ओ हा, खैर है, खैर है, खैर है भेटे तलाव रे नदीसी नदी भेटे सागरासी सागर भेटतो कुणासी? कुणी जाणे ना
|
१
|
सूरज को धरती तरसे धरती को चंद्रमा पानी में सिप जैसे प्यासी हर आत्मा ओ मितवा रे पानी में सिप जैसे प्यासी हर आत्मा बुंद छुपी किस बादल में कोई जाने ना
|
सूर्यास्तव धरती वेडी धरतीस्तव चंद्रमा पाण्यातील शिंपेपरी तहानेला आत्मा ओ मित्रा रे पाण्यातील शिंपेपरी तहानेला आत्मा थेंब मेघी लपले कुठल्या कुणी जाणे ना
|
२
|
अन्जाने होठोंपर क्यूँ पहचाने गीत हैं कलतक जो बेगाने थे जन्मों के मित हैं ओ मितवा रे कलतक जो बेगाने थे जन्मों के मित हैं क्या होगा कोनसे पल में कोई जाने ना
|
अनोळखी ओठांवर का गीत ओळखीचे अनोळखी इथवर होते आज ते जीवाचे ओ मित्रा रे अनोळखी इथवर होते आज ते जीवाचे होईल काय क्षणात कुठल्या कुणी जाणे ना
|
https://www.youtube.com/watch?v=9Za8ZtfHXXY
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.