मूळ हिंदी
गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतकार:
रोशन, गायक: लता
मंगेशकर
चित्रपट:
ममता, सालः १९६६, भूमिकाः सुचित्रा सेन, अशोककुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०५२३
धृ रहते थे कभी जिनके दिल में राहे कधी ज्यांचे हृदयी
मी १ दावा था जिन्हें हमदर्दी का होती सहानुभूती तर का २ बरसों के सुलगते तन मन पर वर्षांच्या धधगत्या काळावर ३ सौ रुप धरे जीने के लिये शत रूप धरून जगण्याकरता
हम जान से भी प्यारों की तरह
बैठे हैं उन्ही के कूचे में
हम आज गुनहगारों की तरह
प्राणप्रिय आप्तासमची मी
बसले मी बैठकीत त्यांच्याचि
जणू आज बनुनी अपराधी
खुद आके न पूछा हाल कभी
महफ़िल में बुलाया है हम पे
हँसने को सितमगारों की तरह
माझे पुसले ना हाल कधी
मैफलीत बोलावले मजला
दोषी गणुनी हसण्याकरता
अश्कों के तो छींटे दे ना सके
तपते हुए दिल के ज़ख्मों पर
बरसे भी तो अंगारों की तरह
अश्रूंचे तुषारहि देऊ न शकले
तापल्या मनाच्या जखमांवर
बरसलेही निखारे जणू वरुनी
बैठे हैं हज़ारों ज़हर पिये
ठोकर ना लगाना हम खुद हैं
गिरती हुई दीवारों की तरह
बसले मी हजारो पिऊन विषे
लाथाडू नका मी आज असे
ढासळत्या भिंतींपरी राशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.