२०२५-१२-१२

गीतानुवाद-३२०: इतना तो याद है मुझे

मूळ हिंदी गीतः आनंद बक्षी, संगीतः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गायकः लता, मोहम्मद रफ़ी
चित्रपटः मेहेबूब की मेहेंदी, सालः १९७१, भूमिकाः राजेश खन्ना, लीना चंदावरकर 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०९२२

धृ

इतना तो याद है मुझे
, इतना तो याद है मुझे
हाय, इतना तो याद है मुझे
के उनसे मुलाक़ात हुई
बाद में जाने क्या हुआ
ना जाने क्या बात हुई

इतके तर आठवे मला
ओ, इतके तर आठवे मला
हाय, इतके तर आठवे मला
तिच्याशी मुलाखत झाली
झाले काय नंतर त्याच्या
न जाणे मग काय झाले

वादे वफ़ा के, करके, कसमें उठा के
किसी पे दिल लूटा के, चला आया
नज़रें मिलाके, नीँद अपनी गँवाके
कसक दिल में बसाके, चला आया
दिन तो गुज़र जायेगा
क्या होगा जब रात हुई

प्रेमाच्या शपथा, घेऊन, आश्वासने देऊन
मन कुणावर, ओवाळून, निघुन आलो
नजरांना निरखून, झोप आपली गमावून
पीड हृदयी ती घेऊन, निघुन आलो
दिस तर कसाही निघेल
काय होईल जेव्हा रात येईल

मारे हया के, मैं तो आँखे झुकाके
ज़रा दामन बचाके चली आयी
पर्दा हटाके उनकी बातों में आके
उन्हें सूरत दिखाके चली आयी
किस से शिक़ायत करूँ
शरारत मेरे साथ हुई

लाजेने भारून, मी तर डोळेही झुकवून
स्वतःलाच वाचवून, निघुन आले
पदर मी हटवून, त्यांच्या बोलण्यात येऊन
त्यांना चेहरा दाखवून, निघुन आले
तक्रार कुणाशी करू
खोडी तर माझी काढली

थी इक कहानी पहले ये ज़िंदगानी
उन्हें देखा तो जीना मुझे आया
दिल्बर-ओ-जानी, शर्म से पानी पानी
हुई मैं बस पसीना मुझे आया
ऐसे मैं भीग गयी जैसे के बरसात हुई

एवढीच कहाणी, आधी होती पुराणी
तिला पाहिले अन जगणे, मला आले
ए माझ्या प्रियकरा, होऊन चूरच लाजेने
मज घामच फुटलेला होता तेव्हा
भिजले अशी मी जणू, जसा की पाऊस झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.