श्री. संतोष कुलकर्णी गुरूजी, पंढरपूर यांचे विनंतीवरून अनुवादिलेली
सुंदर कविता!
TEACHER - P. Sheshadri
http://horseshoenail-samiksha.blogspot.com/2011/12/teacher-psheshadri.html
शिक्षकाचे पारितोषिक - मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०९२३
१
|
In the halls of learning, I have toiled
these years And hourly sought to draw the youthful
mind To love of knowledge urging it to find The highest joy in books; No haunting fears of fruitless work have chilled my
soul
|
ज्ञानानंद तसाच गंध सगळा, ग्रंथांतला साजरा
विद्यार्थ्यांस मिळो म्हणून झटलो, आकर्षिले त्यांजला
वेळोवेळि किती प्रयास गुरुकुळी, मी योजिले तत्त्वता
ते देतील फळे अशी कधि न मी, आशा करे कष्टता
|
२
|
and sneers have not become my endeavours No kind of wavering faith, I trust will
ever blind My eyes to bliss in this task appears But then what guerdon do i seek for all this work?
|
नाही मी उपहास येउ दिधला, यत्नी कधी प्रत्यही
कल्याणी न कधी उदास गमलो, श्रद्धा सुटोनी मुळी
यासाठी तरिही करावि कुठल्या, लाभाचि मी कामना
जी होईल यशस्वि खास अशि मी, की बाळगावी स्पृहा?
|
३
|
If once some pupil toiling hard Will find the rapture of Master's world, And pausing gratefully my name recall Tracing his joy, in part , to what he
heard And learnt from me - it'll be rich
reward!!
|
एखादाहि कधी खरा परिश्रमी, विद्यार्थि आनंदला
ज्ञानानंद तया कृतज्ञ करता, तो आठवू लागला
तो अध्यापनि माग शोधत जरी, माझ्याप्रती पोचला
ते मी मानिन पारितोषिक मला, मोठेच अध्यापिता
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.