२०२१-०७-१९

गीतानुवाद-२१७: उनसे मिली नजर

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता
चित्रपटः झुक गया आसमान, सालः १९६८, भूमिकाः सायरा बानू, राजेंद्रकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०११०८१४ 

धृ

उनसे मिली नजर के मेरे होश उड गये
ऐसा हुआ असर के मेरे होश उड गये

जादू अशी नजर, की माझे भान हरपले
ऐसे मी गुंतले, की माझे भान हरपले

जब वो मिले मुझे पहली बार
उनसे हो गयी आँखे चार
पास न बैठे पल भर वो
फिर भी हो गया उनसे प्यार
इतनी थी बस खबर के मेरे होश उड गये

जेव्हा भेटलो पहिल्यांदा
नजरानजरी घडतांना
क्षणभर बसले न, त्यांच्या जवळ
जडले तरी मन त्यांचेवर
एवढीचशी बातमी, की माझे भान हरपले

उनकी तरफ दिल खिंचने लगा
बढके कदम फिर रुकने लगा
पास गयी मैं जाने क्यों
अपने आप दम घुटने लगा
छाये वो इस कदर के मेरे होश उड गये

त्यांच्याकडेच मन घेई ओढ
पुढे एक पाऊल, एक मागे ओढ
गेले जवळ मी का जाणे
झाली सुरू आपसुक तगमग
भरले असे मनात, की माझे भान हरपले

घर मेरे आया वो मेहेमान
दिल में जगाये सौ तुफान
देख के उनकी सुरत को
हाय रह गयी मैं हैरान
तडपू इधर उधर के मेरे होश उड गये

माझ्या घरी ते पाहुणे आले
मनात शंभर सुरू वादळे
पाहून त्यांच्या मुखकमळा
पार थक्क मी, लागे लळा
तळमळू इथे तिथे, की माझे भान हरपले

 

https://www.youtube.com/watch?v=vZMugvWNg-I

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.