२०२४-१२-३०

गीतानुवाद-३०५: आयेगा आनेवाला

मूळ हिंदी गीतः नक्शाब जरावची, संगीतः खेमचंद प्रकाश, गायकः लता
चित्रपटः महल, सालः १९४९, भूमिकाः अशोककुमार, मधुबाला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२१८


धृ

ख़ामोश है ज़माना चुप-चाप हैं सितारे
आराम से है दुनिया बेकल है दिल के मारे
ऐसे मेंकोईआहट इस तरहआ रही है
जैसे कि चल रहाहै मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है इक आस के सहारे
आयेगा आयेगा आयेगा
आयेगा आनेवाला आयेगा आयेगा

चुपचाप जग हे सारे चुपचाप सर्व तारे
निवांत लोक सारे अस्वस्थ प्रीतीप्यारे
अशातच एक चाहूल येते अशी जणू की
चालून येत कुणीसे जैसे मनात माझ्या
वा स्पंदते हृदय हे कुठल्याशा जणू आशेवर
येईल येईल येईल
येणारा नक्की येईल येईल

दीपक बग़ैर कैसे परवाने जल रहे हैं
कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं
तड़पेगा कोई कब तक बे-आस बे-सहारे
लेकिन ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे

ज्योतीविनाच कैसे जळतात हे पतंग
कोणी नसे धनुर्धर तरी तीर चालतात
तळमळेल कोणी कुठवर असहाय्य अन्‌ निराश
तरीही हे सांगतात मनचे माझ्या इशारे

भटकी हुई जवानी मंज़िल को ढूँढती है
माझी बग़ैर नैया साहिल को ढूँढती है
क्या जाने दिलकी कश्ती
कबतक लगे किनारे
लेकिन ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे

भरकटलेले यौवन ईप्सित शोधते आहे
नाविक नसून नावही बघ तीर शोधते आहे
न जाणे मनाची नौका
पोहोचे कधी तिरावर
तरीही हे सांगतात मनचे माझ्या इशारे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.