मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायकः लता
चित्रपटः इज्जत, सालः १९६८, भूमिकाः
तनुजा, धर्मेंद्र
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०२०४
धृ
|
ये दिल तुम बिन कहीं, लगता नहीं हम क्या करें तसव्वुर में कोई बसता नहीं हम क्या करें लुटे दिल में दिया जलता नहीं हम क्या करें तुम्हीं कह दो अब ऐ जाने-अदा हम क्या करें
|
हे मन तुजविण कुठे, लागत नाही मी काय करू आठवणींत कुणी राहत नाही मी काय करू हरपलेल्या मनी दिवा पेटत नाही मी काय करू तूच सांग आता मनमोहना मी काय करू
|
१
|
किसी के दिल में बस के दिल को तड़पाना नहीं अच्छा निगाहों को छलकते देख के छुप जाना नहीं अच्छा उम्मीदों के खिले गुलशन को झुलसाना नहीं अच्छा हमें तुम बिन कोई जचता नहीं हम क्या करें
|
कुणाच्या मनी राहून मनाला तळमळवणे नाही बरे डोळ्यांना आसवे गाळता पाहून लपून जाणे नाही बरे उमेदीच्या उपवनी बहारी पोळणे नाही बरे मला तुजविण कोणी रुचत नाही मी काय करू
|
३
|
मोहब्बत कर तो लें लेकिन मोहब्बत रास आये भी दिलों को बोझ लगते हैं कभी ज़ुल्फ़ों के साये भी हज़ारों ग़म हैं इस दुनिया में अपने भी पराये भी मोहब्बत ही का ग़म तन्हा नहीं हम क्या करें
|
प्रीती करावी तरी मात्र ती रासही यावी मनाला बोझ वाटतसे कधी केसांचीही छाया हजारो दुःखे या दुनियेत आपलीही नी परकीही प्रीतीचे दुःख एकलेच नाही मी काय करू
|
४
|
बुझा दो आग दिल की या इसे खुल कर हवा दे दो जो इसका मोल दे पाये उसे अपनी वफ़ा दे दो तुम्हारे दिल में क्या है बस हमें इतना पता दे दो के अब तन्हा सफ़र कटता नहीं हम क्या करें
|
विझव ही आग मनची वा हवा हिजला खुली दे तू जो तिचे मोल देऊ शकतो तया प्रीती तू दे आपली तुझ्या मनात काय आहे याचा सुगावा मला दे तू आता एकट्याने पथ न सरतो मी काय करू
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.