२०२४-१२-२८

गीतानुवाद-३०३: तुम रुठी रहो मै मनाता रहू

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मुकेश, लता
चित्रपटः आस का पंछी, सालः १९६१, भूमिकाः राजेंद्रकुमार, वैजयंती माला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०७१५


धृ

तुम रूठी रहो मैं मनाता रहूँ
कि इन अदाओं पे और प्यार आता है
थोड़े शिक़वे भी हों कुछ शिकायत भी हो
तो मज़ा जीने का और भी आता है

तू रुसूनच रहा मी खुश तुज करेन
लकबी याच आवडत आहेत आता
कधी राजी असो, नाराजीही कधी
तर जगण्यात येते अधिकच मजा

हाय दिल को चुराकर ले गया
मुँह छुपा लेना हमसे वो आपका
देखना वो बिगड़ कर फिर हमें
और दांतों में ऊँगली का दाबना
ओ मुझे तेरी क़सम यही समाँ मार गया
इसी जलवे पे तेरे दोनों जहाँ हार गया

चित्त चोरूनच नेणे सखये तुझे
मजपासून मुखही लपवणे तुझे
मग कृतककोपपूर्वक ते पाहणे तुझे
बोट ओठांवर ठेऊन ते हसणे तुझे
तुझी शपथ भाव हेच वेधून गेले
या तोर्‍यावर जगच मी हरलो तुला

ये न समझो कि तुमसे दूर हूँ
तेरे जीवन की प्यार भरी आस हूँ
चाँद के संग जैसे है चाँदनी
वैसे मैं भी तेरे दिल के पास हूँ
हाय वो दिल नहीं जो न धड़कना जाने
और दिलदार नहीं जो न तड़पना जाने

नको समजू मी तवपासून दूर आहे
तव जीवनी प्रेमळ मी आस आहे
चंद्रम्यासोबत असते जसे चांदणे
तशीच मीही तव अंतरातच आहे
ते तर हृदयच नाही जे स्पंदत नाही
तो न दिलदारही जो न मुळि तळमळे

चाहें कोई डगर हो प्यार की
ख़त्म होगी न तेरी-मेरी दास्ताँ
दिल जलेगा तो होगी रोशनी
तेरे दिल में बनाया है आशियाँ
ओ शरद पूनम की रंग भरी चाँदनी
मेरी सब कुछ मेरी तक़दीर मेरी ज़िन्दगी

मार्ग कुठलाही हो प्रेम करण्याचा गं
तुझी माझी कहाणी संपणारच नाही
मन उजळलेच तर प्रकाशही पडेल
तव मनातच वसवले आहे मी घर
शरद पुनवेचे रंगीत तू चांदणे
माझे सर्वस्वच, तू माझे जीवन आहेस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.