२०२४-१२-०८

गीतानुवाद-२९६: हम हैं राही प्यार के

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः किशोरकुमार
चित्रपटः नौ दो ग्यारह, सालः १९५७, भूमिकाः देवानंद, कल्पना कार्तिक 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२०८


धृ

हम हैं राही प्यार के
हम से कुछ न बोलिए
जो भी प्यार से मिला
हम उसी के हो लिए

मी पथिक प्रीतीचा
मला न काही नाव द्या
पुकारे प्रीतीने मला
होत मी त्याचा सदा

दर्द भी हमें क़ुबूल
चैन भी हमें क़ुबूल
हम ने हर तरह के फूल
हार में पिरो लिए

दुःखही असे कबूल
सुखही असे कबूल
हर प्रकारचे मी फूल
या सरात ओवले

धूप थी नसीब में
धूप में लिया है दम
चाँदनी मिली तो हम
चाँदनी में सो लिए

होते नशीबात उन
राहिलो उन्हातही
मिळाले चांदणे तसे
त्यातही सुखावलो

दिल का आसरा लिए
हम तो बस यूँही जिए
इक क़दम पे हँस लिए
इक क़दम पे रो लिए

हृदय आश्रया धरून
मी असाच राहलो
हसलो एका पावली
रडलो पावली दुजा

राह में पड़े हैं हम
कब से आप की क़सम
देखिए तो कम से कम
बोलिए न बोलिए

पथावरीच राहलो
शपथ तुझी कधीचा मी
कमीत कमी पाहा तरी
बोल वा नकोस तू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.