मूळ हिंदी गीतः राजिन्दर कृष्ण,
संगीतकारः सी. रामचंद्र, गायकः हेमंत कुमार,
लता मंगेशकर
चित्रपटः अनारकली, सालः १९५३, भूमिकाः
बिना रॉय, प्रदीपकुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०१२४
धृ
|
जाग दर्द-ए-इश्क़ जाग दिल को बेक़रार कर छेड़ के आँसुओं का राग जाग दर्द-ए-इश्क़ जाग
|
ऊठ प्रीतिवेदने ग मनास तू अस्वस्थ कर छेडुन आज अश्रुराग ऊठ प्रीतिवेदने ग
|
१
|
आँख ज़रा लगी तेरी सारा जहान सो गया ये ज़मीन सो गई आसमान सो गया सो गया प्यार का चिराग़ जाग, जाग, जाग, जाग
|
नेत्र जरा मिटले तसे विश्व झोपले इथे जमीन झोपली तशी झोपले आकाशही निजला तसाच प्रीतिदीप ऊठ, ऊठ, ऊठ, ऊठ
|
२
|
किसको सुनाऊँ दास्तां किसको दिखाऊँ दिल के दाग़ जाऊँ कहाँ कि दूर तक जलता नहीं कोई चिराग़ राख बन चुकी है आग जाग दर्द-ए-इश्क़ जाग
|
कुणाला सांगू झाले काय कुणास दावू मनिचे डाग जाऊ कुठे कि दूरवर दिवा जळे न कोणताच राख झाली सारी आग ऊठ प्रीतिवेदने ग
|
३
|
ऐसी चली हवा-ए-ग़म ऐसा बदल गया समा रूठ के मुझ से चल दिये मेरी खुशी के कारवां डस रहें हैं ग़म के नाग जाग दर्द-ए-इश्क़ जाग
|
दुःख असे हे सर्वदूर किती बदलले आसपास रुसून गेले माझ्यावर माझ्या खुशीचे सार्थवाह दंशती हे दुःखनाग ऊठ प्रीतिवेदने ग
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.