मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः ओ.पी.नय्यर, गायकः
आशा भोसले, महंमद रफी
चित्रपटः तुमसा नही देखा, सालः १९५७, भूमिकाः शम्मी कपूर,
अमिता
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२१४
धृ
|
सर पर टोपी लाल हाथ में रेशम का रूमाल हो तेरा क्या कहना ओये गोरे गोरे गाल गाल पे उलझे उलझे बाल हो तेरा क्या कहना
|
वरती टोपी लाल हाती हे रेशमी बघ रूमाल न्यारं हे रूप तुझे ओये गोरे गोरे गाल त्यावरी कुंतल कुरळे छान न्यारं हे रूप तुझे
|
१
|
ओ मेरा दिल ओ जाने – जाँ चुरा के चली कहाँ नशे में भरी भरी ओ चुराऊं मैं दिल तेरा जिगर भी नहीं मेरा उमर भी नहीं मेरी ओये बहकी बहकी चाल है लचके जैसे डाल हो तेरा क्या कहना
|
ओ हृदय कुठे प्रीयतमे चोरून जासी तू धुंदीत ग अशी चोरू मी हृदय तुझे हिंमत नसे मला माझे वयही न एवढे वळती वळती चाल डोलते फांदी तुर्रेदार न्यारं हे रूप तुझे
|
२
|
ओये क्यों दिल पें हाथ है वो क्या ऐसी बात हैं हमे भी बताईये ओ भला इतनी दूर से कहू क्या हुजूर से मेरे पास आईये हो हो के बेहाल बालमा ये सतरंगी चाल हो तेरा क्या कहना
|
छातीवर का हात आहे अशी कोणती बात आहे मलाही तू सांग ना ओ दूर इतका राहून सांगू काय प्रिये मी तुज जवळ ये जरा ग तू बेचैन होऊनी फार राजसा अशी सतरंगी चाल न्यारं हे रूप तुझे
|
३
|
ओ तमन्ना थी कम से कम कोई फूल बन के हम तेरी जुल्फ चूमते ओ रही आरजू सनम तेरा रूप लेके हम शराबी से झुमते ओये बहकी बहकी चाल है लचके जैसे डाल हो तेरा क्या कहना
|
मला वाटे कमीत कमी फूल कुठलेसे बनून तुझे केस चुंबू मी असे वाटे मलाही तुझे रूप घेऊन मी धुंद होऊनी फिरू ओये वळती वळती चाल डोलते फांदी तुर्रेदार न्यारं हे रूप तुझे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.