२०२४-१२-२१

गीतानुवाद-२९९: जगी हा खास वेड्यांचा

मूळ मराठी गीतः वीर वामनराव जोशी, संगीतः वझेबुवा
गायकः मास्टर दीनानाथ, आशा भोसले
नाटकः रणदुंदुभी, सालः १९२७, भूमिकाः तेजस्विनी 

हिंदी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२२१

 

धृ

जगी हा खास वेड्यांचा
पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी
ध्रुवाचा 'वेड' हा तारा

जहाँ में खास जुनूं का ये
चल रहा खेल है न्यारा
लगे इस भ्रांत दुनिया में
जुनूं ही एक ध्रुव तारा

कुणाला वेड कनकाचे
कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या
कुणाचे चित्त ते नाचे

किसी को स्वर्ण का है जुनूं
किसी को कामिनी कि धुन
भ्रांति में राजसत्ताकी
किसी का चित्त है मशगुल

कुणाला देव बहकवी
कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या
निशेने धुंदली भारी

किसी को देव बहकाए
किसी को देश गुल करे है
किसी की नजर धर्म की
है नशे में धुंद हुई भारी

अशा या विविध रंगाच्या
पिशांच्या लहरबहरीनी
दुरंगी दीन दुनियेची
जवानी रंगली सारी

इस तरह विविध रंगों के
जुनूं की लहरबहरोंने
दुरंगी दीन दुनिया की
जवानी खूब हुई रंगीन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.