२०२४-१२-३१

गीतानुवाद-३०६: मचलती हुई हवा में छम छम

मूळ हिंदी गीतः मजरूह सुलतानपुरी, संगीतः चित्रगुप्त, गायकः किशोर, लता
चित्रपटः गंगा की लहरें, सालः १९६४, भूमिकाः किशोरकुमार, धर्मेंद्र, अरुणा इराणी, सावित्री

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२३१


धृ

आ आ आ, आ आ

आ आ आ, आ आ

 

ओ हो हो, हो हो

मचलती हुई, हवा में छम छम
हमारे संग संग चलें, गंगा की लहरें

कि

ओ हो हो, हो हो

उसळती अशा, हवेत छम छम
चालती संग आमच्या, या गंगेच्या लहरी

 

, ज़माने से कहो, अकेले नहीं हम
हमारे संग संग चलें, गंगा की लहरें

ओ, जगाला हे म्हणा, एकटे ना आम्ही
चालती संग आमच्या, या गंगेच्या लहरी

 

मचलती हुई, हवा में छम छम
हमारे संग संग चलें गंगा की लहरें
ज़माने से कहो, अकेले नहीं हम
हमारे संग संग चलें, गंगा की लहरें

कोरस

उसळती अशा, हवेत छम छम
चालती संग आमच्या, या गंगेच्या लहरी
ओ, जगाला हे म्हणा, एकटे ना आम्ही
चालती संग आमच्या, या गंगेच्या लहरी

हरियाली सी, छा जाती है
छाँव में इन के आँचल की

कि

हिरवळ सगळी, पसरत जाते
गंगेच्या पदरात इथे

 

सर को झुका के, नाम लो इन के
ये तो है शक्ती निरबल की
हिमालय ने भी चूमे हैं
इन के क़दम

नम्र होऊनी, नाव हिचे घ्या
ही तर दुर्बळाचीही शक्ती
हिमालयाने सदा स्पर्शिले
हिचेच चरण

सुख में डूबा, तन मन उस का
आया जो इन के, आँगन में

सुखात भिजले, तन मन त्याचे
आला हिच्या या, अंगणी जो

 

प्यार का पहला दर्पन देखा
दुनिया ने इन के दर्शन में
के यूँ ही नहीं खाते हम
इन की क़सम

कि

प्रेमाचा पहिला आरसा पाहते
हिच्याच जळी जग सारेची
उगाच नाही घेत शपथ आम्ही
प्रत्यही हिच्या चरणांची

साथ दिया है, इन लहरों ने
जब सब ने मुँह फेर लिया

कि

साथ दिली आहे या लहरींनी
कुणी न सोबत केली तवा

 

और कभी जब, ग़म की जलती
धूप ने हम को घेर लिया
तो आओ इन के ही क़दमों
में झुक जाएं हम

आणि कधी जव, दुःख कोसळे
आम्हाला जणू घेरुनीही
तेव्हा या मग हिच्याच चरणी
होऊ आम्ही नतमस्तक  

२०२४-१२-३०

गीतानुवाद-३०५: आयेगा आनेवाला

मूळ हिंदी गीतः नक्शाब जरावची, संगीतः खेमचंद प्रकाश, गायकः लता
चित्रपटः महल, सालः १९४९, भूमिकाः अशोककुमार, मधुबाला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२१८


धृ

ख़ामोश है ज़माना चुप-चाप हैं सितारे
आराम से है दुनिया बेकल है दिल के मारे
ऐसे मेंकोईआहट इस तरहआ रही है
जैसे कि चल रहाहै मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है इक आस के सहारे
आयेगा आयेगा आयेगा
आयेगा आनेवाला आयेगा आयेगा

चुपचाप जग हे सारे चुपचाप सर्व तारे
निवांत लोक सारे अस्वस्थ प्रीतीप्यारे
अशातच एक चाहूल येते अशी जणू की
चालून येत कुणीसे जैसे मनात माझ्या
वा स्पंदते हृदय हे कुठल्याशा जणू आशेवर
येईल येईल येईल
येणारा नक्की येईल येईल

दीपक बग़ैर कैसे परवाने जल रहे हैं
कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं
तड़पेगा कोई कब तक बे-आस बे-सहारे
लेकिन ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे

ज्योतीविनाच कैसे जळतात हे पतंग
कोणी नसे धनुर्धर तरी तीर चालतात
तळमळेल कोणी कुठवर असहाय्य अन्‌ निराश
तरीही हे सांगतात मनचे माझ्या इशारे

भटकी हुई जवानी मंज़िल को ढूँढती है
माझी बग़ैर नैया साहिल को ढूँढती है
क्या जाने दिलकी कश्ती
कबतक लगे किनारे
लेकिन ये कह रहे हैं दिल के मेरे इशारे

भरकटलेले यौवन ईप्सित शोधते आहे
नाविक नसून नावही बघ तीर शोधते आहे
न जाणे मनाची नौका
पोहोचे कधी तिरावर
तरीही हे सांगतात मनचे माझ्या इशारे

२०२४-१२-२९

गीतानुवाद-३०४: ख़यालों में किसी के

मूळ हिंदी गीतः केदार शर्मा, संगीतः रोशन, गायकः गीता दत्त, मुकेश
चित्रपटः बावरे नैन, सालः १९५०, भूमिकाः राज कपूर, गीता दत्त 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०७१८


धृ

ख़यालों में किसी के
इस तरह आया नहीं करते
किसी को बेवफ़ा आ आ के
तड़पाया नहीं करते
दिलों को रौंद कर दिल अपना
बहलाया नहीं करते
जो ठुकराए गए हों उनको
ठुकराया नहीं करते

गीता:



मुकेश:

विचारांतही कुणाच्या
असे येऊ नये कोणी
कृतघ्ने येऊ येऊनी
तळमळवू नये कोणी
हृदये तुडवून इतरांची
मन न रमवावे कधी कोणी
जे ठोकरले आहेत आधीच
तयांना ठोकरू नये कोणी

हँसी फूलों की दो दिन
चाँदनी भी चार दिन की है
मिली हो चाँद सी सूरत
तो इतराया नहीं करते
जिन्हें मिटना हो वो
मिटने से डर जाया नहीं करते
मुहब्बत करने वाले
ग़म से घबराया नहीं करते

गीता:



गीता:

सुंदर फुलांची ऐट दो दिसांची
चांदणेही चारच दिवसांचे
मिळाले चंद्रमुख तरीही
एवढे शेफारू नये कोणी
ज्यांना संपायचे आहे ते
तयाने घाबरत नाहीत
दुःखाला प्रेम करणारे
मुळिही घाबरत नाहीत

मुहब्बत का सबक सीखो
ये जाकर जलनेवालों से
के दिल की बात भी लब तक
कभी लाया नहीं करते

मुकेश:

प्रेमाचा पाठ हा घ्यावा
जळत्यांकडेच जाऊनी
मनातील गोष्टही कधीही
मुखी आणू नये कोणी

२०२४-१२-२८

गीतानुवाद-३०३: तुम रुठी रहो मै मनाता रहू

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मुकेश, लता
चित्रपटः आस का पंछी, सालः १९६१, भूमिकाः राजेंद्रकुमार, वैजयंती माला 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०७१५


धृ

तुम रूठी रहो मैं मनाता रहूँ
कि इन अदाओं पे और प्यार आता है
थोड़े शिक़वे भी हों कुछ शिकायत भी हो
तो मज़ा जीने का और भी आता है

तू रुसूनच रहा मी खुश तुज करेन
लकबी याच आवडत आहेत आता
कधी राजी असो, नाराजीही कधी
तर जगण्यात येते अधिकच मजा

हाय दिल को चुराकर ले गया
मुँह छुपा लेना हमसे वो आपका
देखना वो बिगड़ कर फिर हमें
और दांतों में ऊँगली का दाबना
ओ मुझे तेरी क़सम यही समाँ मार गया
इसी जलवे पे तेरे दोनों जहाँ हार गया

चित्त चोरूनच नेणे सखये तुझे
मजपासून मुखही लपवणे तुझे
मग कृतककोपपूर्वक ते पाहणे तुझे
बोट ओठांवर ठेऊन ते हसणे तुझे
तुझी शपथ भाव हेच वेधून गेले
या तोर्‍यावर जगच मी हरलो तुला

ये न समझो कि तुमसे दूर हूँ
तेरे जीवन की प्यार भरी आस हूँ
चाँद के संग जैसे है चाँदनी
वैसे मैं भी तेरे दिल के पास हूँ
हाय वो दिल नहीं जो न धड़कना जाने
और दिलदार नहीं जो न तड़पना जाने

नको समजू मी तवपासून दूर आहे
तव जीवनी प्रेमळ मी आस आहे
चंद्रम्यासोबत असते जसे चांदणे
तशीच मीही तव अंतरातच आहे
ते तर हृदयच नाही जे स्पंदत नाही
तो न दिलदारही जो न मुळि तळमळे

चाहें कोई डगर हो प्यार की
ख़त्म होगी न तेरी-मेरी दास्ताँ
दिल जलेगा तो होगी रोशनी
तेरे दिल में बनाया है आशियाँ
ओ शरद पूनम की रंग भरी चाँदनी
मेरी सब कुछ मेरी तक़दीर मेरी ज़िन्दगी

मार्ग कुठलाही हो प्रेम करण्याचा गं
तुझी माझी कहाणी संपणारच नाही
मन उजळलेच तर प्रकाशही पडेल
तव मनातच वसवले आहे मी घर
शरद पुनवेचे रंगीत तू चांदणे
माझे सर्वस्वच, तू माझे जीवन आहेस

२०२४-१२-२७

गीतानुवाद-३०२: प्यार हुआ, इक़रार हुआ है

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता, मन्ना डे
चित्रपटः श्री ४२१०, सालः १९५५, भूमिकाः राज कपूर, नर्गीस, नादिरा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२१६


धृ

प्यार हुआ, इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?
कहता है दिल, "रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल"

प्रेम झाले, मंजूर झाले
तरी मन का त्याला घाबरते?  
म्हणते हे मन, “रस्ता आहे कठीण”
माहीत नाही कुठे आहे ईप्सित”

कहो कि अपनी प्रीत का
गीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो, "इस राह का
मीत ना बदलेगा कभी"
प्यार जो टूटा, साथ जो टूटा,
चाँद ना चमकेगा कभी

बोल तू आपल्या प्रीतीचे
गीत न मुळि बदलेल कधी
बोल तू ही, “या वाटेची
साथ न मुळि बदलेल कधी”
प्रेम मोडता, साथ सोडता,
चंद्र पुन्हा न दिसेल कधी

रातें दसों दिशाओं से
कहेंगी अपनी कहानियाँ
गीत हमारे प्यार के
दोहराएँगी जवानियाँ
मैं ना रहूँगी, तुम ना रहोगे,
फिर भी रहेंगी निशानियाँ

रात्री दहा दिशांतूनी
आपापल्या वदतील कथा
गीत आमच्या प्रीतीचे
गातील पुन्हा नव्या पिढ्या
राहीन मी ना, राहशील तू ना
राहतील तरिही याच खुणा

२०२४-१२-२६

गीतानुवाद-३०१: जाग दर्द-ए-इश्क़ जाग

मूळ हिंदी गीतः राजिन्दर कृष्ण, संगीतकारः सी. रामचंद्र, गायकः हेमंत कुमार, लता मंगेशकर
चित्रपटः अनारकली, सालः १९५३, भूमिकाः बिना रॉय, प्रदीपकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०१२४


धृ

जाग दर्द-ए-इश्क़ जाग
दिल को बेक़रार कर
छेड़ के आँसुओं का राग
जाग दर्द-ए-इश्क़ जाग

ऊठ प्रीतिवेदने ग
मनास तू अस्वस्थ कर
छेडुन आज अश्रुराग
ऊठ प्रीतिवेदने ग

आँख ज़रा लगी तेरी
सारा जहान सो गया
ये ज़मीन सो गई
आसमान सो गया
सो गया प्यार का चिराग़
जाग, जाग, जाग, जाग

नेत्र जरा मिटले तसे
विश्व झोपले इथे
जमीन झोपली तशी
झोपले आकाशही
निजला तसाच प्रीतिदीप
ऊठ, ऊठ, ऊठ, ऊठ

किसको सुनाऊँ दास्तां
किसको दिखाऊँ दिल के दाग़
जाऊँ कहाँ कि दूर तक
जलता नहीं कोई चिराग़
राख बन चुकी है आग
जाग दर्द-ए-इश्क़ जाग

कुणाला सांगू झाले काय
कुणास दावू मनिचे डाग
जाऊ कुठे कि दूरवर
दिवा जळे न कोणताच
राख झाली सारी आग
ऊठ प्रीतिवेदने ग

ऐसी चली हवा-ए-ग़म
ऐसा बदल गया समा
रूठ के मुझ से चल दिये
मेरी खुशी के कारवां
डस रहें हैं ग़म के नाग
जाग दर्द-ए-इश्क़ जाग

दुःख असे हे सर्वदूर
किती बदलले आसपास
रुसून गेले माझ्यावर
माझ्या खुशीचे सार्थवाह
दंशती हे दुःखनाग
ऊठ प्रीतिवेदने ग

२०२४-१२-२४

गीतानुवाद-३००: ये दिल तुम बिन

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायकः लता
चित्रपटः इज्जत, सालः १९६८, भूमिकाः तनुजा, धर्मेंद्र 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०२०४


धृ

ये दिल तुम बिन
कहीं, लगता नहीं
हम क्या करें
तसव्वुर में
कोई बसता नहीं
हम क्या करें
लुटे दिल में
दिया जलता नहीं
हम क्या करें
तुम्हीं कह दो
अब ऐ जाने-अदा
हम क्या करें

हे मन तुजविण
कुठे, लागत नाही
मी काय करू
आठवणींत
कुणी राहत नाही
मी काय करू
हरपलेल्या मनी
दिवा पेटत नाही
मी काय करू
तूच सांग आता
मनमोहना
मी काय करू

किसी के दिल में
बस के दिल को
तड़पाना नहीं अच्छा
निगाहों को
छलकते देख के
छुप जाना नहीं अच्छा
उम्मीदों के
खिले गुलशन को
झुलसाना नहीं अच्छा
हमें तुम बिन
कोई जचता नहीं
हम क्या करें

कुणाच्या मनी
राहून मनाला
तळमळवणे नाही बरे
डोळ्यांना
आसवे गाळता पाहून
लपून जाणे नाही बरे
उमेदीच्या
उपवनी बहारी
पोळणे नाही बरे
मला तुजविण
कोणी रुचत नाही
मी काय करू

मोहब्बत कर तो लें
लेकिन मोहब्बत
रास आये भी
दिलों को
बोझ लगते हैं
कभी ज़ुल्फ़ों के साये भी
हज़ारों ग़म हैं
इस दुनिया में
अपने भी पराये भी
मोहब्बत ही का ग़म
तन्हा नहीं
हम क्या करें

प्रीती करावी तरी
मात्र ती
रासही यावी
मनाला बोझ
वाटतसे
कधी केसांचीही छाया
हजारो दुःखे
या दुनियेत
आपलीही नी परकीही
प्रीतीचे दुःख
एकलेच नाही
मी काय करू

बुझा दो
आग दिल की
या इसे खुल कर हवा दे दो
जो इसका
मोल दे पाये
उसे अपनी वफ़ा दे दो
तुम्हारे दिल में
क्या है बस हमें
इतना पता दे दो
के अब तन्हा
सफ़र कटता
नहीं हम क्या करें

विझव ही
आग मनची
वा हवा हिजला खुली दे तू
जो तिचे
मोल देऊ शकतो
तया प्रीती तू दे आपली
तुझ्या मनात
काय आहे याचा
सुगावा मला दे तू
आता एकट्याने
पथ न सरतो
मी काय करू

२०२४-१२-२१

गीतानुवाद-२९९: जगी हा खास वेड्यांचा

मूळ मराठी गीतः वीर वामनराव जोशी, संगीतः वझेबुवा
गायकः मास्टर दीनानाथ, आशा भोसले
नाटकः रणदुंदुभी, सालः १९२७, भूमिकाः तेजस्विनी 

हिंदी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४१२२१

 

धृ

जगी हा खास वेड्यांचा
पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी
ध्रुवाचा 'वेड' हा तारा

जहाँ में खास जुनूं का ये
चल रहा खेल है न्यारा
लगे इस भ्रांत दुनिया में
जुनूं ही एक ध्रुव तारा

कुणाला वेड कनकाचे
कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या
कुणाचे चित्त ते नाचे

किसी को स्वर्ण का है जुनूं
किसी को कामिनी कि धुन
भ्रांति में राजसत्ताकी
किसी का चित्त है मशगुल

कुणाला देव बहकवी
कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या
निशेने धुंदली भारी

किसी को देव बहकाए
किसी को देश गुल करे है
किसी की नजर धर्म की
है नशे में धुंद हुई भारी

अशा या विविध रंगाच्या
पिशांच्या लहरबहरीनी
दुरंगी दीन दुनियेची
जवानी रंगली सारी

इस तरह विविध रंगों के
जुनूं की लहरबहरोंने
दुरंगी दीन दुनिया की
जवानी खूब हुई रंगीन

२०२४-१२-२०

गीतानुवाद-२९८: हर दिल जो प्यार करेगा

मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मुकेश, लता, महेंद्र कपूर
चित्रपटः संगम, सालः १९६४, भूमिकाः राज कपूर, वैजयंतीमाला, राजेंद्रकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२४०७२७


धृ

हर दिल जो प्यार करेगा
वो गाना गाएगा
दीवाना सैकड़ों में
पेहेचाना जाएगा

जो जो कधी प्रेम करेलच
तो गाणे गाईल हो
प्रेमात खुळावलेला
नजरेतच भरतो हो

आप हमारे दिल को चुरा कर
आँख चुराये जाते हैं
ये इक तरफ़ा रसम-ए-वफ़ा हम
फिर भी हम निभाएं जाते है
चाहत का दस्तूर है लेकिन
आप को ही मालूम नहीं
ओ ओ ओ ओ
जिस मेहफ़िल में शम्मा हो
परवाना गायेगा

माझे मन का चोरून आता
नजरा चोरत राहसी तू
एकतर्फी ही रीत प्रीतीची
निभावतो का तरीही मी
प्रीतीचा हा नियमच आहे
तुलाच तरी माहीत नाही

ओ ओ ओ ओ
मैफलीत ज्योत जिथे हो
तिथे पतंगही गातो

भूली बिसरी यादें मेरे
हँसते गाते बचपन की
रात बिरात चली आतीं हैं
नींद चुराने नैनन की
अब कह दूँगी, करते करते
कितने सावन बीत गये
ओ ओ ओ ओ
जाने कब इन आँखों का
शरमाना जायेगा

विसरलेल्या बालपणीच्या
हसत्या गात्या आठवणी
राती अपराती चालून येती
नीज हरवण्या नेत्रीची
सांगीन आता, म्हणता म्हणता
कितीतरी श्रावण गेले की

ओ ओ ओ ओ
न जाणे केव्हा नयनांचे
लाजणे हे जाईल हो

अपनी अपनी सब ने कह ली
लेकिन हम चुपचाप रहे
दर्द पराया जिसको प्यारा
वो क्या अपनी बात कहे
ख़ामोशी का ये अफ़साना
रह जायेगा बाद मेरे
ओ ओ ओ ओ
अपनाकर हर किसी को
बेगाना जायेगा

आपले आपले सर्व बोलले
तरी मी राहिलो गप्प सदा
परक्याचे दुःख ज्याला प्यारे
तो काय आपली गोष्ट वदेल
गप बसण्याचे हे खूळही
माझ्यामागे राहील
ओ ओ ओ ओ
जिंकून सगळ्यांनाही तो
परकाची जाईल हो