२०२१-०६-०८

गीतानुवाद-२०४: ओ बसंती

चित्रपटः जिस देश में गंगा बहती है, सालः १९६०, भूमिकाः राज कपूर, पद्मिनी, प्राण
गायिकाः लता, संगीतः शंकर-जयकिशन, मूळ हिंदी गीतकारः शैलेंद्र 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०३०५

धृ

ओ बसंती पवन पागल
ना जा रे ना जा, रोको कोई

ए वसंतातील समीरा
नको ना जाऊ, जाऊ नको

बन के पत्थर हम पड़े थे
सूनी सूनी राह में
जी उठे हम जब से तेरी
बांह आई बांह में
छीन कर नैनों के काजल
ना जा रे ना जा, रोको कोई

रुक्ष अन् वैराण पथी ह्या
राहिले होऊन दगड
जीव आला जीवनी या
हात तू देता, फिरून
घेऊनी डोळ्यातील काजळ
नको ना जाऊ, जाऊ नको

याद कर तूने कहा था
प्यार से संसार है
हम जो हारे दिल की बाजी
ये तेरी ही हार है
सुन ये क्या कहती है पायल
ना जा रे ना जा, रोको कोई

आठव तू होतेस म्हटले
प्रेमाने संसार हा
हारले प्रेमात बाजी
ही तुझीच की हार आहे
ऐक म्हणती काय पैंजण
नको ना जाऊ, जाऊ नको


https://www.youtube.com/watch?v=vkWFtG5nFyI

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.