२०२१-०६-१०

गीतानुवाद-२०५: मेरे महबूब तुझे

मूळ हिंदी गीतः शकील, संगीत नौशाद, गायकः रफी, लता
चित्रपटः मेरे मेहबूब, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्रकुमार, साधना, अमीता, अशोककुमार, निम्मी 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०३१०

धृ

मेरे महबूब तुझे मेरी मुहब्बत की कसम
फिर मुझे नर्गिसी आँखों का सहारा देदे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा देदे

हे प्रियकरा तुला माझ्या प्रीतीची शपथ
पुन्हा तव नेत्रकमलांचा मज सहारा दे तू
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

ऐ मेरे ख़्वाब की ताबीर मेरी जान--जिगर
ज़िन्दगी मेरी तुझे याद किये जाती है
रात दिन मुझको सताता है तस्सव्वुर तेरा
दिल की धड़कन तुझे आवाज़ दिये जाती है
आ मुझे अपनी सदाओं का सहारा देदे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा देदे

ए माझ्या स्वप्नांच्या अर्था, ए माझे प्राणसख्या
माझे आयुष्य, आठवण तुझी, करतच राहते
अहर्निश सय तुझी, सतवतच राहते आहे मला
स्पंदने हृदयाची माझ्या, बोलावती नेहमीच तुला
दे आधार मला भावना तुझ्याही सांगून
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

याद है मुझको मेरी उम्र की पहली वो घड़ी
तेरी आँखों से कोई जाम पिया था मैंने
मेरी रग-रग में कोई बर्क सी लहराई थी
जब तेरे मरमरी हाथों को छुआ था मैंने
आ मुझे फिर उन्हीं हाथों का सहारा देदे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा देदे

आठवत आहे मला, आयुष्यातली पहिली ती वेळ
तुझ्या डोळ्यांनी मी, रसरंग चाखला होता
माझ्या धमन्यांतुनी, सौदामिनी चमकली जणू
जेव्हा तुझ्या मऊमऊ, हातांचा स्पर्शही झाला
ये मला त्याच, हातांचा पुन्हा आधार दे तू
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

सामने आके ज़रा परदा उठादे रुख से
इक यही मेरा इलाज--ग़म--तन्हाई है
तेरी फ़ुरक़त ने परेशान किया है मुझको
अब तो मिल जा के मेरी जान पे बन आई है
दिल को भूली हुई यादों का सहारा दे दे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा दे दे

ये समोर अनावृत्त या रूपास कर तू
हाच माझ्या विरहाच्या व्यथेचा आहे इलाज
तुझ्या विरहाने किती त्रस्त केले आहे मला
आता तरी भेट की हे बेतले जीवावर आहे
मनाला, विसरलेल्या स्मृतींचा सहारा दे तू
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

भूल सकती नहीं आँखें वो सुहाना मंज़र
जब तेरा हुस्न मेरे इश्क़ से टकराया था
और फिर राह में बिखरे थे हज़ारोँ नग़में
मैं वो नग़में तेरी आवाज़ को दे आया था
साज़--दिल को उन्हीं गीतों का सहारा दे दे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा दे दे

विसरू शकती ना डोळे तो चेहरा मोहक
जेव्हा सौंदर्य तुझे प्रेमाशी टक्करले माझ्या
आणि मग वाटेवर विखुरलेली हजारो गीते
मी ती गीते तुझ्या आवाजाला देऊन आलो
त्याच गीतांचा, हृदसंगीता, सहारा दे तू
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

याद है मुझको मेरी उम्र की पहली वो घड़ी
तेरी आँखों से कोई जाम पिया था मैंने
मेरी रग-रग में कोई बर्क सी लहराई थी
जब तेरे मरमरी हाथों को छुआ था मैंने
आ मुझे फिर उन्हीं हाथों का सहारा देदे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा देदे

आठवत आहे मला, आयुष्यातली पहिली ती वेळ
तुझ्या डोळ्यांनी मी, रसरंग चाखला होता
माझ्या धमन्यांतुनी, सौदामिनी चमकली जणू
जेव्हा तुझ्या मऊमऊ, हातांचा स्पर्शही झाला
ये मला त्याच, हातांचा आधार दे तू
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

मैने इक बार तेरी एक झलक देखी है
मेरी हसरत है के मैं फिर तेरा दीदार करूँ
तेरे साए को समझ कर मैं हंसीं ताजमहल
चाँदनी रात में नज़रों से तुझे प्यार करूँ
अपनी महकी हुई ज़ुल्फ़ों का सहारा दे दे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा देदे

मी तर एकवार तुझी एक छबी देखिली आहे
माझी इच्छा आहे की मी पुन्हा तुझे रूप बघू
तुझ्या छायेला समजून मी प्रिय ताजमहाल
चांदण्या रात्री नजरेने तुजसी प्रेम करू
तुझ्या सुगंधित केसांचा मज सहारा दे तू
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

ढूँढता हूँ तुझे हर राह में हर महफ़िल में
थक गये हैं मेरी मजबूर तमन्ना के कदम
आज का दिन मेरी उम्मीद का है आखिरी दिन
कल न जाने मैं कहाँ और कहाँ तू हो सनम
दो घड़ी अपनी निगाहों का सहारा दे दे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा देदे

शोधतो तुजसी मी हर पथी, हर मैफलीतही
थकून असहाय्य गेली पावलेही कांक्षेची माझ्या
आजचा दिन माझ्या आशेचा आहे अंतीम दिवस
न जाणत मी कुठे, नी तू कुठे, असशील उद्या
दो घडी आपल्या, नयनांचा सहारा दे तू
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

सामने आके ज़रा परदा उठादे रुख से
इक यही मेरा इलाज--ग़म--तन्हाई है
तेरी फ़ुरक़त ने परेशान किया है मुझको
अब तो मिल जा के मेरी जान पे बन आई है
दिल को भूली हुई यादों का सहारा दे दे
मेरा खोया हुआ रंगीन नज़ारा दे दे

ये समोर अनावृत्त या रूपास कर तू
हाच माझ्या विरहाच्या व्यथेचा आहे इलाज
तुझ्या विरहाने किती त्रस्त केले आहे मला
आता तरी भेट की हे बेतले जीवावर आहे
मनाला, विसरलेल्या स्मृतींचा सहारा दे तू
माझा हरपलेला रंगपट मला पुन्हा दे तू

ताबीर  = स्वप्नार्थ; बर्क = वीज; मंजर = विश्रांतीस्थान, दृश्य, चेहरा

https://www.youtube.com/watch?v=kJ3DwFWhQuE रफी

https://www.youtube.com/watch?v=xzPGBnKt8z0 लता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.