२०२१-०६-११

गीतानुवाद-२०६: ऐ मेरे दिल कहीं और चल

मूळ हिंदी गीतकारः शैलेंद्र, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः तलत महमूद
चित्रपटः दाग, सालः १९५२, भूमिकाः दिलीपकुमार, निम्मी, उषाकिरण 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०११०६३०

 

धृ

ऐ मेरे दिल कहीं और चल
गम की दुनिया से दिल भर गया
ढुंढ ले अब कोई घर नया

ए मना तू कुठे दूर चल
दुःखी जीवनास जीव ऊबला
आसरा बघ आता तू नवा

चल जहाँ गम के मारे न हो
झुठी आशा के तारे न हो
झुठी आशा के तारे न हो
उन बहारों से क्या फायदा
जिस में दिल की कली जल गई
जख्म फिर से हरा हो गया

चल जिथे त्रासले कुणी नसो
खोट्या आशेचे तारे न हो
खोट्या आशेचे तारे न हो
त्या बहारीचा काय फायदा
मन-कळी जीत कोमेजली
घाव पुन्हा नवा जाहला

चार ऑसू कोई रो दिया
फेर के मुँह कोई चल दिया
फेर के मुँह कोई चल दिया
लुट रहा था किसी का जहाँ
देखती रह गयी ये जमीं
चुप रहा बेरहम आसमाँ

चार अश्रू कुणी ढाळले
तोंड फिरवून कुणी चालले
तोंड फिरवून कुणी चालले
जग कुणाचे हिरावत होते
पाहतच राहिली ही जमीन
निर्दयी नभहि चुप राहिले

 

 

http://www.youtube.com/watch?v=_aFqiq7yHI8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.