२०२१-०६-१३

नृपनीती

खोटी, खरी, मृदु, कठोर कधी असे ती
हत्या करे, म्हणत काहि कधी दयाळू
खर्चीकही, विपुल वित्तवती कधी ती
वेश्येपरी बहुरुपा नृपनीति रे ती ॥ - वसंततिलका 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०६१३

मूळ संस्कृत श्लोकः

श्री. आनंद घारे यांच्या चर्यापुस्तक भिंतीवरून साभार! 

सत्याsनृता च परुषा प्रियवादिनी च
हिंस्रा दयालुरपि चार्थपरा वदान्या ।
नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च
वाराङ्गनेव नृपनीतिर् अनेकरूपा ॥ - वसंततिलका 

नीतिशतक-४७, राजा भर्तृहरी, इसवीसनपूर्व-५५४ वर्षे

अर्थ: राजनीती (राजाचे धोरण) एकाद्या वेश्येप्रमाणे निरनिराळ्या रूपांमध्ये आणि चंचल असते. कधी तिच्यात खरेपणा असतो, तर कधी खोटेपणा (फसवणूक) असतो, कधी ती कठोर बोलते तर कधी गोड बोलते, कधी हिंसक तर कधी दयाळू असते, कधी तिला पैशाचा हव्यास असतो, तर कधी ती उदार होते, कधी कंजूस असते तर कधी खूप धन साठवत असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.