मूळ हिंदी गीतः साहिर,
संगीतः रोशन, गायकः रफी,
लता
चित्रपटः भीगी रात,
सालः १९६५, प्रदीपकुमार, मीना कुमारी, अशोककुमार
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१००११९
धृ
|
दिल जो ना कह सका वोही राज़-ए-दिल कहने की
रात आई
|
गूज, जे न उमटले ते मनाचे गूज आता, वदण्याची रात आली
|
१
|
नग़मा सा कोई जाग उठा
बदन में झंकार की सी थरथरी
है तन में हो, प्यार की इन्हीं धड़कती धड़कती फ़िज़ाओं में रहने
की रात आई
|
गाणे कोणतेसे जागले शरीरी तार छेडिली जणू कुणी अंतरीची हो, प्रेमाच्या या स्पंदत्या स्पंदत्या बहारीतच, राहण्याची रात आली
|
२
|
तौबा ये किस ने
अंजुमन सजा के टुकड़े किये हैं गुंच-ए-वफ़ा के उछालो गुलों के
टुकड़े के रंगीं फ़िज़ाओं में
रहने की रात आई
|
पाहा हे कुणी या मैफलीस सजवून तुकडे केले ह्या प्रीतीच्या फुलांचे उधळा आता हे तुकडे की रंगीत बहारीतच राहण्याची रात आली
|
३
|
चलिये मुबारक ये जश्न
दोस्ती का दामन तो थामा आप ने
किसी का हो, हमें तो खुशी यही है तुम्हें भी किसी को
अपना कहने की रात आई
|
ठरो मैत्रीचा हा सोहळा शुभंकर हात तू कुणाचा तरी, हाती घेतलास मला तर खुशी असे ही तुलाही कुणास आपला म्हणण्याची रात आली
|
४
|
सागर उठाओ दिल का
किस को ग़म है आज दिल की क़ीमत जाम
से भी कम है पियो चाहे खून-ए-दिल हो के पीते पिलाते ही
रहने की रात आई
|
करा पेयपाने, मन मोडणे न दुःखद आज सुरेहूनही मना कमी किंमत प्या, जरी असो ते रक्त ईप्सिताचे की पीत आणि पाजतच राहण्याची रात आली
|
५
|
अब तक दबी थी एक मौज-ए-अरमाँ लब तक जो आई बन गई
है तूफ़ाँ हो, बात प्यार की बहकती बहकती निगाहों से
कहने की रात आई
|
आजवरच्या सूप्त इच्छेचा प्रवाह मुखावरती येता उमटले हे वादळ हो, गोष्ट प्रेमाचीच ढळत्या, ढळत्या कटाक्षांनी वदण्याची रात आली
|
६
|
ग़ुज़रे न ये शब खोल
दूँ ये ज़ुल्फ़ें तुमको छुपा लूँ मूँद
के ये पलकें हो, बेक़रार सी लरज़ती लरज़ती सी छाँवों में
रहने की रात आई
|
सरो ना ही रात, मोकलू हे केस डोळे मिटू का मी साठवून चित्र हो, अस्वस्थशा बुजर्या बुजर्या सावलीतच, राहण्याची रात आली
|
https://www.youtube.com/watch?v=3EDPAe4P2EY रफी
https://www.youtube.com/watch?v=IFEwzBJlpb4 लता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.