२०२१-०६-०७

गीतानुवाद-२०३: पवन दीवानी

मूळ गीतकार: मजरूह, संगीत: सचिनदेव बर्मन, गायक: लता
चित्रपट: डॉ.विद्या, साल: १९६२, भूमिका: वैजयंतीमाला, मनोजकुमार 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०९०६

धृ

हाय, पवन दीवानी
पवन दीवानी
न माने, उड़ाये
मोरा घूँघटा
आ ली
पवन दीवानी

हाय, झुळुक खुळी ती
झुळुक खुळी ती
न ऐके, उडवे
पदराला ती
आली
झुळुक खुळी ती

उलझी लट हमारी
लिपटी मोरी सारी
पथ पे कोई जैसे
मारे पिचकारी
छेड़ छेड़ जाये
चंचल मस्तानी
मस्तानी

गुंतली बट ती माझी
चिकटली अन् साडी
मार्गी कुणी जैसी
मारे पिचकारी
खोडी जणू काढी
अवखळ स्वच्छंदी
स्वच्छंदी

सा नि ध म ग
ध म ध नि प
नि ध नि नि सा
अखियाँ तरसे मोरी
डगरी नहीं सूझे
कित चली मैं गोरी
बैरन सब बूझे
झूम झूम रोके
फिर भी मर जानी

सा नि ध म ग
ध म ध नि प
नि ध नि नि सा
आसुसती डोळे,
वाटही ना उमजे
कुठे मी जात नारी
सर्वही ती समजे
गिरकी घेत रोखे
तरीही सरणारी


 
https://www.youtube.com/watch?v=8khKmlWbOTM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.