खोटी, खरी, मृदु, कठोर
कधी असे ती
हत्या करे, म्हणत
काहि कधी
दयाळू ॥
खर्चीकही, विपुल
वित्तवती कधी ती
वेश्येपरी बहुरुपा
नृपनीति रे ती ॥ - वसंततिलका
मराठी अनुवादः नरेंद्र
गोळे २०२१०६१३
मूळ संस्कृत श्लोकः
श्री. आनंद घारे यांच्या
चर्यापुस्तक भिंतीवरून साभार!
सत्याsनृता च परुषा प्रियवादिनी च
हिंस्रा दयालुरपि
चार्थपरा वदान्या ।
नित्यव्यया
प्रचुरनित्यधनागमा च
वाराङ्गनेव नृपनीतिर्
अनेकरूपा ॥ - वसंततिलका
नीतिशतक-४७, राजा भर्तृहरी,
इसवीसनपूर्व-५५४ वर्षे
अर्थ: राजनीती (राजाचे धोरण) एकाद्या वेश्येप्रमाणे निरनिराळ्या रूपांमध्ये आणि चंचल
असते. कधी तिच्यात खरेपणा असतो, तर
कधी खोटेपणा (फसवणूक) असतो, कधी
ती कठोर बोलते तर कधी गोड बोलते, कधी
हिंसक तर कधी दयाळू असते, कधी
तिला पैशाचा हव्यास असतो, तर
कधी ती उदार होते,
कधी कंजूस असते तर कधी खूप धन
साठवत असते.