२०१५-०६-२९

त्रासांक

एखाद्या दिवशी उगाचच त्रास जाणवत असतो. तापमान फार चढे नसते, तरीही खूप वाटत असते. वातावरणाच्या त्रासदायकतेचे काही मोजमाप करता येईल का? दोन निरनिराळ्या दिवसांच्या त्रासदायकतेत काही तुलना करता येईल का? हा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा ’त्रासांका’ची व्याख्या केली गेली.

हा निर्देशांक व्यक्तीवरील उष्णता प्रभावाचे मूल्यमापन करतो. त्यात तापमान आणि आर्द्रता ह्या दोन्हींच्या संयुक्त प्रभावांचा समावेश होत असतो. दक्षिण आफ्रिकेच्या हवामानसेवेकडून त्रासांक शोधून काढण्याकरता पुढील सूत्राचा वापर केला जात असतो.

त्रासांक = (२ x T) + (Rh/१०० x T) + २४
ह्यात  
T  म्हणजे अंश सेल्शस मध्ये व्यक्त केलेले शुष्कदीप (तापमापकाचा पाराधारक दीप जर हवेत असेल तर मोजलेले तापमान शुष्कदीप तापमान ठरते. जर तो ओल्या कापडात गुंडाळलेला असेल तर मोजलेले तापमान आर्द्रदीप तापमान ठरते.) म्हणजेच हवेचे तापमान आणि
Rh  म्हणजे टक्केवारीत व्यक्त केलेली सापेक्ष आर्द्रता.

म्हणूनच जर तापमान ३०°C  आणि सापेक्ष आर्द्रता Rh = ६० % असेल तर
त्रासांक = २ x ३० + (६०/१००)x३० + २४ = १०२ होईल.

त्रासांक
०९० ते १०० असल्यास त्रासदायक वाटत असते
१०० ते ११० असल्यास खूपच त्रासदायक वाटत असते मात्र
११० हून अधिक असेल तर ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते.

हवेची सापेक्ष आर्द्रता शुष्क-दीप-तापमान आणि आर्द्र-दीप-तापमान जाणून घेऊन त्यावरून आकडेमोडीने काढता येते, म्हणून आर्द्रदीप तापमानासहितचे सूत्रही तयार केले जाऊ शकते.



SOUTH AFRICA
What is the discomfort index?

This index evaluates the impact of heat stress on the individual taking into account the combined effect of temperature and humidity.

The formula used by the SA Weather Service to calculate discomfort index is:

Discomfort Index = DI = (2 x T) + ( Rh/100 x T) + 24

SO, at 30°C and 60% Rh: DI=2x30 + (60/100)x30 +24 = 60+18+24 = 102

Where:
T is the dry-bulb or air temperature in degrees Celsuis
Rh is the percentage relative humidity
This index gives the following degrees of discomfort:

90-100 - very uncomfortable
100-110 - extremely uncomfortable
110+ - hazardous to health


Since the relative humidity of the air can be calculated from the dry-bulb and wet-bulb temperatures, the formula can also be adapted to use the wet-bulb temperature instead of the relative humidity.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.