२०१५-०६-२१

गीतानुवाद-०५०: ज्योति कलश छलके

मूळ हिंदी गीतकार: नरेंद्र शर्मा, संगीतकार: सुधीर फडके, गायीकाः लता
चित्रपटः भाभी की चूँडियाँ, सालः १९५९, भूमिकाः मीना कुमारी

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०११०


धृ
ज्योति कलश छलके
हुए गुलाबी, लाल सुनहरे
रंग दल बादल के
ज्योति कलश छलके
ज्योती कलश झळके
होत गुलाबी, लाल स्वर्णमयी
रंग जलधरांचे
ज्योती कलश झळके 

घर आंगन वन उपवन उपवन
करती ज्योति अमृत के सींचन
मंगल घट ढल के
घर-अंगण, वन-उपवन उपवन
करत प्रभा अमृत रस सिंचन
मंगलघट उजळे

पात पात बिरवा हरियाला
धरती का मुख हुआ उजाला
सच सपने कल के
पात पात वनराई हिरवी
धरती तेज मुखीचे मिरवी
स्वप्न खरे पुढचे


ऊषा ने आँचल फैलाया
फैली सुख की शीतल छाया
मिचे आँचल के
प्रभात पखरण करते माया
करत सुखाची शीतल छाया
आणखी त्या शीतल छायेने


ज्योति यशोदा धरती मैय्या
नील गगन गोपाल कन्हैय्या
श्यामल छवि झलके
धरतीमाता जणू यशोदा
निळे गगन गोपाल कन्हया
श्यामल छबी झळके


अम्बर कुमकुम कण बरसाये
फूल पँखुड़ियों पर मुस्काये
बिन्दु तुहि न जल के
अंबर कुमकुम कण बरसवते
कळ्या-पाकळ्यांवर स्मित करते
जलबिंदुंतून ते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.