२०१५-०६-१३

गीतानुवाद-०४६: साथी हाथ बढाना

मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी, संगीतः .पीं.नय्यर, गायकः मोहम्मद रफी, आशा भोसले इतर, चित्रपटः नया दौर, सालः १९५७, भूमिकाः दिलीपकुमार, वैजयंती माला

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००५१२१६

धृ
साथी हाथ बढाना साथी हाथ बढाना
एक अकेला थक जाए तो मिल कर बोझ उठाना
द्या की हात गड्यांनो द्या की हात गड्यांनो
एक एकटा थकून जाईल वाटून ओझे घ्या हो

हम मेहनतवालों ने जब भी मिलकर कदम बढाया
सागर ने रस्ता छोडा परबत ने शीश झुकाया
फौलादी हैं सीने अपने फौलादी हैं बाहें
हम चाहे तो पैदा कर दे चट्टानों में राहे
जेव्हा एकजुटीने आम्ही कष्ट उपसले सारे
समुद्र झाला देता रस्ता नतमस्तक नग झाले
पोलादी ह्या छात्या आपल्या हातही पोलादी हे
इच्छू जर तर घडवू मोठ्या प्रस्तरी आम्ही रस्ते

मेहनत अपनी लेख की रेखा, मेहनत से क्या डरना
कल गैरों के खातिर की, अब अपने खातिर करना
अपना दुख भी एक है साथी, अपना सुख भी एक
अपनी मंझिल सच की मंझिल, अपना रस्ता नेक
कष्ट करू या प्राक्तनातले, कष्टांना का भ्यावे
सत्यसमर्थन ध्येय आपले, मार्गही सच्चे आपले
इतरांसाठी झटलो इथवर, आपल्यास्तवही झटावे
दुःखही एकच आपले आणि, सुखही एकच आपले

एक से एक मिले तो कतरा, बन जाता है दरिया
एक से एक मिले तो जर्रा, बन जाता है सेहरा
एक से एक मिले तो राई, बन सकती है परबत
एक से एक मिले तो इन्साँ, बस में कर ले किस्मत
थेंबे थेंबे साचते तळे, होऊही शकतो दरिया
एक एक कण जुळवून बनतो, मुकुटही छान शिरीचा
राई राई चा होई पर्वत, ठाऊक नाही आम्हा का?
तद्वत मनुजा मनुज भेटता, वशही करू शके नशीबा

माटी से हम लाल निकालें मोती लाए जल से
जो कुछ इस दुनिया में बना है बना हमारे बल से
कब तक मेहनत के पैरों में ये दौलत की जंजीरें
हाथ बढाकर छीन लो अपने सपनों की तस्वीरें
भूमीतूही हिरे काढतो पाण्यातूनही मोती
जे जे घडले असे जगी ह्या घडते जनशक्ती ती
कुठवर कष्टकऱ्यांच्या पायी साखळ श्रीमंतीचे
हिसकावून घ्या, स्वप्नामधली आपल्या सगळी चित्रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.