२०१५-०६-०९

गीतानुवाद-०४३: दुआ कर

मूळ हिंदी गीतः राजेंद्र कृष्ण, संगीतः सी रामचंद्र, गायकः लता
चित्रपटः अनारकली, सालः १९५३, भूमिकाः बीना राय, प्रदीप कुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००४०७०४


धृ
दुआ कर,
वफाओं का मजबूर, दामन बिछाकर
दुआ कर गमे दिल, खुदा से दुआ कर
प्रार्थना कर,
असहाय्य प्रीतीलाची, ठेऊन साक्षी
मना प्रार्थना कर, तू सर्वेश्वराची

जो बिजली चमकती है, उनके महलपर
वो कर ले तसल्ली, मेरा घर जलाकर
सलामत रहे तू, मेरी जान जाए
मुझे इस बहाने से, ही मौत आए
करुन्गी मै क्या, चन्द सासे बचाकर
जी कडाडे तडित, त्याचे महालावरी ती
सुखावो करून भस्म, माझे घरासी
सुखरूप रहा तू, जीव माझा जावो
मला ह्या निमित्तानेची, मरण येवो
मला काय जरूर, काही श्वास वाचवण्याची

मै क्या दू तुझे, मेरा सब लुट चुका है
दुआ के सिवा, मेरे पास और क्या है
गरीबों का एक, आसरा--खुदा है
मगर मेरी तुझसे, यही इल्तजा है
दिल तोडना, दिल की दुनिया बसाकर
देऊ काय तुला, मी सर्वस्व गमावले
प्रार्थनेशिवाय शक्य, मला काय आहे ?
गरीबांचा तो, एकची वाली आहे
तरी माझी तुजला, अर्जी एक आहे
मन मोडू नको, भेट घडवून मनाची



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.