मूळ हिंदी गीतः शकील, संगीत
नौशाद, गायकः
रफी, लता
चित्रपटः लीडर, सालः
१९६४, भूमिकाः
दिलीपकुमार, वैजयंतीमाला, जयंत
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७२२
॥
धृ
॥
|
एक शहनशाह ने बनवा के हसीं ताजमहल
सारी दुनिया को मुहब्बत की निशानी दी है
इसके साये मे सदा प्यार के चर्चे होंगे
खत्म जो हो ना सकेगी वो कहानी दी है
|
एका सम्राटाने सुंदरसा घडून ताजमहल
सार्या दुनियेला प्रेमाची दिली खूण आहे
याच्या छायेत सदा प्रेमाची चर्चा होईल
जी न संपेल कधीही ती कहाणी दिली आहे
|
॥
१
॥
|
ताज वो शम्मा है उल्फ़त के सनम खाने की
जिसके परवानो मे मुफ़लिस भी ज़रदार भी है
संग-ए-मरमर मे समाए हुए ख्वाबों की क़सम
मरहले प्यार के आसान भी दुश्वार भी हैं
दिल को एक जोश इरादों को जवानी दी है
|
ताज ती ज्योत आहे प्रेम-मंदिरामधली
जिच्या पतंगांत राजे आहेत, रंकही आहेत
संगमरवराच्या अंतरातील स्वप्नांची शपथ
प्रेमाच्या पायर्या सोप्याही, अवघडही आहेत
यौवन इच्छांना, मनालाही उभारी दिली आहे
|
॥
२
॥
|
ताज इक ज़िन्दा तसव्वुर है किसी शायर का
इसक अफ़साना हकीकत के सिवा कुछ भी नही
इसके आगोश मे आकर ये गुमां होता है
ज़िन्दगी जैसे मुहब्बत के सिवा कुछ भी नही
ताज ने प्यार की मौजों को रवानी दी है
|
ताज आहे जीती आठवण कुण्या कवीची ही
ज्याची कहाणी ही इतिहासाविना काहीच नाही
ज्याच्या परिघात आशंका मनी ही येते
जणू जीवन हे प्रेमाच्या शिवाय काहीच नाही
ताजने प्रेमाच्या धारेस प्रवाही केले आहे
|
॥
३
॥
|
ये हसीं रात ये महकी हुई पुरनूर फ़ज़ा
हो इजाज़त तो ये दिल इश्क़ का इज़हार करे
इश्क़ इन्सान को इन्सान बना देता है
किसकी हिम्मत है मुहब्बत से जो इनकार करे
आज तकदीर ने ये रात सुहानी दी है
|
ही रम्य रात, ही सुगंधितशी बहारही पुरती
तू जर म्हणशील तर, मी प्रीतीचा उच्चार करेन
प्रेम माणसाला माणूस घडवून देते
कुणाची हिंमत आहे प्रेमाला नकार देईल तो
आज नशीबाने ही रात्र मोहमय दिली आहे
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.