२०२२-१२-१८

गीतानुवाद-२६०: वक़्त से दिन और रात

मूळ हिंदी गीतकारः साहिर, संगीतः रवी, गायिका: मन्ना डे
चित्रपटः वक्त, सालः १९६५, भूमिका: साधना, राज कुमार 

मराठी अनुवादः  नरेंद्र गोळे २०१३०७०५

प्र
स्ता

कल जहाँ बटती थी खुशिया
आज है मातम वहाँ
वक्त लाया था बहारे
वक्त लाया है खिजा

काल जिथं आनंद वितरे
आज तिथं शोकच महा
काळानेच आणली बहार
काळानेच आणला अकाल


धृ

वक्त की गर्दिश से है
चाँद तारों का निजाम
वक्त की ठोकर में है
क्या हुकुमत क्या समाज

काळाच्या संकटात
आहे चंद्रसूर्यांचा प्रकाश
काळाच्या पायाशी आहे
राजसत्ता वा समाज



वक़्त से दिन और रात
वक़्त से कल और आज
वक़्त की हर शय ग़ुलाम
वक़्त का हर शय पे राज

काळामुळेच हो दिनरात
काळामुळेच काल अन्‌ आज
काळाचा हर क्षण गुलाम
क्षणोक्षणी काळाचे राज



वक़्त की पाबन्द हैं
आते जाते रौनके
वक़्त है फूलों की सेज
वक़्त है काँटों का ताज

काळाला बांधील आहे
येती जाती आतिषे
काळ पुष्पशय्या कधी
काळ मुकुट काटेरीही



आदमी को चाहिये
वक़्त से डर कर रहे
कौन जाने किस घड़ी
वक़्त का बदले मिजाज़

माणसाने पाहिजे
घाबरून काळास राहणे
कोण जाणे कुठल्या क्षणी
मर्जी काळाची फिरेल


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.