२०२२-१२-१८

गीतानुवाद-२६१: मैं ने एक ख़्वाब सा देखा है

मूळ हिंदी गीतकार: साहिर, संगीत: रवी, गायक:
चित्रपट: वक्त, साल: १९६५, भूमिका: शशी कपूर, शर्मिला टागोर 

मराठी अनुवाद:  नरेंद्र गोळे २०१३०७०५


धृ

मैं ने एक ख़्वाब सा देखा है
कहो
सुन के शरमा तो नहीं जाओगी?
नहीं, तुम से नहीं

मी एक स्वप्न पाहिले आहे
सांग ना
ऐकून लाजणार तर नाहीस
नाही, तुझ्यापाशी नाही



मैं ने देखा है कि फूलों से लडी शाखों में
तुम लचकती हुई यूँ मेरी क़रीब आई हो
जैसे मुद्दत से यूँ ही साथ रहा हो अपना
जैसे अब की नहीं सदियों की शनासाई हो

पाहिले मी की फुलांनी बहरल्या शाखांत
मुरडत माझ्यापाशी आलेली आहेस तू
जणू काही दीर्घकाळ आपण सोबतच आहोत
आजचा नाही कधीचाच सहवास आपला असे



मैं ने भी ख़्वाब सा देखा है
कहो, तुम भी कहो
खुद से इतरा तो नहीं जाओगे?
नहीं खुद से नहीं

मीही एक स्वप्न पाहिले आहे
सांग, तूही सांग स्वप्न तुझे
स्वतःवरच खुश तर होणार नाहीस ना?
नाही स्वतःवर नाही



मैं ने देखा कि गाते हुए झरनों के क़रीब
अपनी बेताबी--जज़बात कही है तुम ने
काँपते होंठों से रुकती हुई आवाज़ के साथ
जो मेरे दिल में थी वो बात कही है तुम ने

पाहिले मी की गाणार्‍या झर्‍यांच्या पाशी
तुझ्या अनिवार भावनांना व्यक्तवले आहेस
कापत्या ओठांत थांबल्या आवाजासोबत
माझ्या मनातलीच गोष्ट, बोलली ग तू आहेस



आँच देने लगा क़दमों के तले बर्फ़ का फ़र्श
आज जाना कि मुहब्बत में है गर्मी कितनी
संगमरमर की तरह सख़्त बदन में तेरे
आ गयी है मेरे छू लेने से नर्मी कितनी

ऊब देऊ करे पायांतळी बर्फाची फरस
आज कळले की प्रीत ऊबही देते किती ते
संगमरवरापरी कठीण शरीर ते तवही
माझ्या स्पर्शाने किती झाले मुलायम आहे



हम चले जाते हों और दूर तलक कोई नहीं
सिर्फ़ पत्तों के चटकने की सदा आती है
दिल में कुछ ऐसे ख़यालात ने करवट ली है
मुझ को तुम से नहीं अपने से हया आती है

आम्ही चाललो दूरवर पण कुणीही नाही
फक्त पानांच्या टपकण्याची चाहूलच येते
मनात काही असल्या विचारांनी उचल केली
मला तुझी नाही, स्वतःचीच शरम येत आहे



मैं देखा है कि कोहरे से भरी वादी में
मैं ये कहता हूँ चलो आज कहीं खो जायें
मैं ये कहती हूँ कि खोने की ज़रूरत क्या है
ओढ कर धुंध की चादर को यहीं सो जायें

पाहिले मी की धुके दाटल्या खोर्‍यात
म्हणतो मी की चला जाऊ कुठेशी हरवून
म्हणते मी की हरवण्याची जरूरच काय आहे
पांघरून धुक्याची चादर इथेच झोपू या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.