२०२२-१२-१६

गीतानुवाद-२५७: ज़रा नज़रों से कह दो जी

मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः हेमंतकुमार, गायकः हेमंतकुमार
चित्रपटः बीस साल बाद, सालः १९६२, भूमिकाः वहिदा रहमान, विश्वजीत 

नरेंद्र गोळे २०२२१२१५

 

धृ

ज़रा नज़रों से कह दो जी
निशाना चूक न जाए
ज़रा नज़रों से कह दो जी
मज़ा जब है तुम्हारी
हर अदा क़ातिल ही कहलाए
ज़रा नज़रों से कह दो जी

सांग नजरेस जरा तू की
निशाणा चूक ना होवो
सांग नजरेस जरा तू की
मजा तेव्हाच, प्रिये होते
तुझी हर लकब जीवघेणी  
सांग नजरेस जरा तू की

क़ातिल तुम्हे पुकारूँ के
जान-ए-वफ़ा कहूँ
हैरत में पड़ गया हूँ
के मैं तुम को क्या कहूँ
ज़माना है तुम्हारा
ज़माना है तुम्हारा चाहे
जिसकी ज़िंदगी ले लो
अगर मेरा कहा मानो
तो ऐसे खेल न खेलो
तुम्हारी इस शरारत से
न जाने किस की मौत आए

जीवघेणी म्हणू तुज की
प्राणप्रिये म्हणू तुज मी
बुचकळ्यात पडलो आहे की
मी तुला काय म्हणू
काळ तुझा पक्षधर आहे
काळ तुझा पक्षधर आहे
हवे त्याचे प्राण घे तू
माझे म्हणणे ऐकशील तर
असे नको खेळ खेळू
तुझ्या खोडीने असल्या
कुणाचे प्राण ना जावो

हाय कितनी मासूम
लग रही हो तुम
तुमको ज़ालिम कहे
वो झूठा है
ये भोलापन तुम्हारा
ये भोलापन तुम्हारा
ये शरारत और ये शोखी
ज़रूरत क्या तुम्हें तलवार की
तीरों की खंजर की
नज़र भर के जिसे तुम देख लो
वो खुद ही मर जाए

हाय किती निरागस
भासते आहेस तू
जीवघेणी म्हणणारा
नक्कीच खोटा असेल
हे भोळेपण तुझे
हे भोळेपण तुझे
खोडकरपण, चपळताही
जरूरच काय तुला
तीर, तलवार, खंजिरांची
डोळेभर पाहसी ज्याला तो
आपसुखच मरून जाई

हम पे क्यों इस क़दर बिगड़ती हो
छेड़ने वाले तुमको और भी हैं
बहारों पर करो गुस्सा
उलझती हैं जो आँखों से
हवाओं पर करो गुस्सा
जो टकराती हैं ज़ुल्फ़ों से
कहीं ऐसा न हो कोई
तुम्हारा दिल भी ले जाए

मजवर का अशी होशी नाराज
तुला डिवचणारे इतरही आहेत
बहारीवर राग धर तू
जी डोळ्यांत भरून राहे
हवेवरती राग धर तू
जी सदा उडवत बटा राहे
चुकून होवो न असेही की
कुणी तव हृदय हरून जावो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.