मूळ हिंदी गीतः जावेद अख्तर, संगीतः शंकर अहसान लॉय, गायकः
उदित नारायण, अलका याग्निक
चित्रपटः दिल चाहता है, सालः २००१,
भूमिकाः आमीरखान, अक्षय खन्ना, सैफ अली, प्रीती झिंटा
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०१२३
धृ
|
जाने क्यूँ लोग प्यार
करते हैं जाने क्यूँ वो किसी
पे मरते हैं जाने क्यूँ ऽ ऽ जाने क्यूँ? जाने क्यूँ? जाने क्यूँ? जाने क्यूँ?
|
कळेना लोक प्रेम का करती? का म्हणून ते कुणावरती मरती? कळेना का? ऽ ऽ कळेना का? कळेना का? कळेना का?
कळेना का?
|
१
|
प्यार में सोचिए
तो बस गम है प्यार में जो सितम
भी हो कम है प्यार में सर झुकाना
पड़ता है दर्द में मुस्कुराना
पड़ता है ज़हर क्यूँ ज़िंदगी
में भरते हैं? जाने क्यूँ वो किसी
पे मरते हैं?
|
प्रेमात पाहता दु:खच केवळ प्रेमी अपराध मुळी कमी नाहीत प्रेमामध्ये लागते वाकावे दुःख लपवुन स्मिताचे देखावे विष जगण्यात का ते कालवती? का म्हणून ते कुणावरती मरती?
|
२
|
प्यार बिन जीनें
में रखा क्या है? प्यार जिस को नहीं
वो तन्हा है प्यार सौ रंग ले
के आता है प्यार ही ज़िंदगी
सजाता है लोग छुप छुप के प्यार
करते हैं जानें क्यूँ साफ़
कहते डरते हैं?
|
प्रेमाविण जीवनात काय आहे? एकटा तो, न जो प्रेमात आहे प्रेम शत रंग लेवूनी येते प्रेम आयुष्य छान सजविते लोक चोरून प्रेम करताती कबूल करण्यास का म्हणून भीती?
|
३
|
प्यार बेकार की मुसीबत
है प्यार हर तरह खूबसूरत
है हो प्यार से हम दूर
ही अच्छे अरे प्यार के सब
रूप हैं सच्चे हो प्यार के घाट
जो उतरते हैं डूबते हैं न वो उभरते
हैं प्यार तो खैर सभी
करते हैं जाने क्यूँ आप ही
मुकरते हैं?
|
प्रेम कटकट निष्कारण आहे प्रेम सुंदर, हर तर्हेने आहे प्रेमापासून दूर रहावे ते बरे प्रेमाचे हर रूप भासते खरे प्रेमसरितेत जे उतरती हो नेमके बुडती, ना तरंगती हो प्रेम सगळे मनापासून करता तुम्हीही का कळेना ना करता?
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.