मूळ हिंदी गीतः शकील बदायुनी, संगीतः नौशाद, गायकः मोहम्मद
रफी
चित्रपटः गझल, सालः १९६३, भूमिकाः राजेंद्रकुमार, साधना
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२२१२१७
धृ
|
मेरे महबूब तुझे मेरी
मोहब्बत की कसम फिर मुझे नर्गिसी आँखों
का सहारा दे दे मेरा खोया हुआ रंगीन
नज़ारा दे दे मेरे महबूब तुझे मेरी
मोहब्बत की कसम
|
प्रिये माझे तुला माझ्या ग प्रीतीचि शपथ मज तुझ्या नजरेची विश्वासफुले ग दे तू मज हरवलेले माझे इंद्रधनु ग दे तू प्रिये माझे तुला माझ्या ग प्रीतीचि शपथ
|
१
|
ऐ मेरे ख्वाब की ताबीर
मेरी जान ए जिगर जिन्दगी मेरी तुझे याद
किये जाती है रातदिन मुझको सताता है
तसव्वुर तेरा दिल की धडकन तुझे आवाज
दिये जाती है आ मुझे अपनी सदाओं का
सहारा दे दे
|
ए माझे स्वप्नफळ, ग प्राणप्रिय सखे माझे जीवन तुझ्या आठवणी काढत असते रातदिन मला आठव ग सतावतो बघ तुझा हृदयस्पंदनही पुकारे बघ प्रत्यही का तुला देई चाहूल तरी, इतका तू दिलासा दे ग
|
२
|
भूल सकती नहीं आँखे वो
सुहाना मंज़र जब तेरा हुस्न मेरे इश्क़
से टकराया था और फिर राह में बिखरे थे
हज़ारो नग्मे मै वो नगमे तेरी आवाज़ को
दे आया था साज़-ए-दिल को उन्हीं
गीतों का सहारा दे दे
|
मी न विसरू शकत माझाच आवडता तो क्षण तुझे सौंदर्य माझ्या प्रीतीस धडकले होते आणि मग वाटेतच स्फुरलेली हजारो गीते मी ती गीते तुझ्या आवाजाला देऊन आलो हृदयस्पंदांना त्या गीतांनी भरवसा दे ग
|
३
|
याद है मुझ को मेरी उम्र
की पहली वो घडी तेरी आँखों से कोई जाम
पिया था मैंने मेरी रग रग में कोई बारक़
सी लहराई थी जब तेरे मरमरी हाथो को
छुआ था मैंने आ मुझे फिर उन्हीं हाथों
का सहारा दे दे
|
याद आहेत मला आयुष्यातील पहिले ते क्षण तुझ्या डोळ्यांनी मी अमृत प्राशिले होते रोमरोमात माझ्या वीज लहरली होती जव तुझ्या मखमली हातांना स्पर्शलो होतो त्या तुझ्या हातांचा आधार मला तू दे ग
|
४
|
मैंने एक बार तेरी एक
झलक देखी है मेरी हसरत है के मै फिर
तेरा दीदार करूँ तेरे साये को समझकर मई
हसीं ताजमहल चांदनी रात में नज़रो से
तुझे प्यार करूँ अपनी मेहकी हुयी ज़ुल्फो
का सहारा दे दे
|
मी एक वार तुला डोळ्यांनी पाहिले आहे मला वाटे की तुझे रूप पाहावे पुन्हा तुझ्या छायेला समजून सुरेख राजमहाल चांदण्या राती मी नजरेने तुला प्रेम करू तव सुगंधीत केसांचा दिलासा दे तू
|
५
|
ढूंढता हूँ तुझे हर राह
में हर महफ़िल में थक गए है मेरी मजबूर
तमन्ना के कदम आजका दिन मेरी उम्मीद का
है आखरी दिन कल न जाने मैं कहा और
कहा तू हो सनम दो घडी अपनी निगाहों का
सहारा दे दे
|
तुला शोधे मी हर मार्गी, दर समारोही थकली आहेत माझ्या दीन इच्छेची पदही आजचा दिस माझ्या आशेचा शेवटला आहे उद्या माहीत नाही असशी कुठे तू, कुठं मी दो घडी नेत्रांचा विश्वास मला तू दे ग
|
६
|
सामने आके ज़रा पर्दा उठा
दे रुख से एक यही मेरा
इलाज-इ-ग़म-इ-तन्हाई है तेरी फुरकत ने परेशां
किया है मुझ को अब तो मिलजा के मेरी जान
पे बन आयी है दिल को भूली हुई यादों
का सहारा दे दे
|
समोर येऊन जरा चेहरा तर दिसू दे ग माझ्या विरहातल्या दुःखाचा तो इलाज आहे तुझ्या विरहाने मला त्रस्त केलेले आहे आता तरी भेट जीवावर बेतले आहे विसरलेल्याशा क्षणांचा ग भरवसा दे तू
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.