मूळ हिंदी गीतः साहिर लुधियानवी,
संगीतः मदनमोहन, गायिकाः लता
चित्रपटः गझल, सालः १९६४, भूमिकाः
मीनाकुमारी
नरेंद्र गोळे २०२००४१७
धृ |
नग्म़ा-ओ-शेर की सौगात किसे पेश करूँ |
उमलत्या काव्याचे हार मी कुणा अर्पू |
१ |
शोख आँखों के उजालों को लुटाऊँ किस पर |
तेजस्वी नयनांचे तेज कुणावर उधळू |
२ |
गर्म सासों में छूपे राज बताऊँ किस को |
उष्ण श्वासांतले गुपीत मी कुणा सांगू |
३ |
कोई हमराज तो पाऊँ, कोई हमदम तो मिले |
कुणी सोबत तर मिळो, कुणी असो
संगत |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.