२०२१-१०-०७

गीतानुवाद-०१३: चमन के फूल भी

मूळ हिंदी गीतकार: फरुख कैसर, संगीत: जी.एस.कोहली, गायक: लता, रफी
चित्रपट: शिकारी, साल १९६३, भूमिकाः अजित, रागिणी, हेलन, मदन पुरी 

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०११८

धृ

चमन के फूल भी तुझ को गुलाब कहते हैं
हमीं नहीं, हैं सभी लाजवाब कहते हैं

उपवनी फुलंही तुलाच गुलाब म्हणतात
न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात

 

नज़र मिला के मेरे दिल की बात पहचानो
सुना है चेहरे को दिल की किताब कहते हैं

जुळवून नजर तू जरा, हृदय माझे जाणून घे
परिसले, चेहर्‍या पुस्तक मनाचे म्हणतात

साज़-ए-दिल छेड़ दिया है
तो ये नग़मा सुन लो
बिखरी बिखरी हुई ये प्यार की
किरणें चुन लो

मनाची छेडलिस तार
तर हे गीत ऐकून घे
विखुरलेलीशी प्रेमाची
किरणे निवडून घे

 

इसी किरण को सनम आफ़ताब कहते हैं

याच किरणांना प्रिये, लोक सूर्य म्हणतात

 

हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
चमन के फूल भी तुझ को



न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात
न फक्त मीसर्व तुज अनुपमेय म्हणतात
उपवनी फुलंही तुलाच

चष्म-ए-हैराँ की कसम
जुल्फ-ए-परेशाँ की कसम
मांग लो जान तुम्हे
आज मेरे जाँ की कसम

चकित नजरांची शपथ
विखुरल्या केसांची शपथ
माग तू आज प्राण माझे
तुला माझ्या प्राणांची शपथ

 

गजब की बात है ये क्या जनाब कहते है
हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
चमन के फूल भी




कमालच आहे काय हे मागता आपण
न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात
न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात
उपवनी फुलंही तुलाच

आज तक देखी नहीं ऐसी दहकती आँखें

आजवर पाहिले ना, हे असे तेजस डोळे

 

डाल दो आ के इन आँखोंमें छलकती आँखें

रोखून डोळ्यांत पाहा, तुझे लावुनी डोळे

 

सम्भल के पीना इसे सब शराब कहते हैं

सावरून प्यावे, हिला जन सुराच म्हणतात

 

हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
हमीं नहीं हैं सभी लाजवाब कहते हैं
चमन के फूल भी



न फक्त मी, सर्व तुज अनुपमेय म्हणतात
न फक्त मीसर्व तुज अनुपमेय म्हणतात
उपवनी फुलंही तुलाच


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.