२०२१-१०-०७

गीतानुवाद-११०: दिल का खिलौना हाय

मूळ हिंदी गीतः भरत व्यास, संगीतः वसंत देसाई, गायीकाः लता
चित्रपटः गूंज उठी शहनाई, सालः १९५९, भूमिकाः राजेंद्र कुमार, अमिता, आनिता गुहा 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०७०४

 

धृ

टूट गया
दिल का खिलौना हाय टूट गया
कोई लुटेरा आ के लूट गया
हाय कोई लुटेरा आ के लूट गया
दिल का खिलौना हाय टूट गया

मोडलं रे
खेळणे मनाचे बघ की मोडलं रे
कुणा लुटारूने येऊन लुटले रे
हाय कुणा लुटारूने येऊन लुटले रे
खेळणे मनाचे बघ की मोडलं रे

हुआ क्या क़ुसूर ऐसा सैंयाँ हमारा
जाते हुये जो तूने हमें ना पुकारा
उल्फ़त का तार तोड़ा
हमें मझधार छोड़ा
हम तो चले थे ले के तेरा ही सहारा
साथी हमारा हमसे छूट गया

घडला क़सूर असला कुठला रे माझा
सादही न घातलीस तू निघतांना
प्रीतीची लय मोडलीस
मला प्रवाहात सोडलीस
मी तर मदतीने होते चालले तुझ्या
सोबती माझा, हरपून गेला

कैसी परदेसी तूने प्रीत लगाई
चैन भी खोया हमने नींद गँवाई
तेरा ऐतबार कर के
हाय इंतज़ार कर के
ख़ुशियों के बदले ग़म की दुनिया बसाई
ज़ालिम ज़माना हमसे रूठ गया

कसे परदेशीया तू प्रेम जडवलेस
सुख ही गमावले, माझी झोपही उडाली
तुझा भरवसा धरून
तुझी प्रतीक्षा करून
सुखाऐवजी दु:खाचे वसवले मी गाव
दुष्ट समाज मजवर रुष्ट झाला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.