२०२१-१०-०७

गीतानुवाद-१७४: गाता रहे मेरा दिल

चित्रपटः गाईड, सालः १९६५, देव आनंद, वहीदा रहमान
मूळ हिंदी गीतः शैलेंद्र, संगीतः सचिनदेव बर्मन, गायकः किशोर, लता 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८०६२७

 

धृ

गाता रहे मेरा दिल
तू ही मेरी मंज़िल
कहीं बीतें न ये रातें
कहीं बीतें न ये दिन

गातच राहो माझे मन
तूच माझे ईप्सित
सरून जावोत न या राती
सरून जावोत न हे दिस

प्यार करने वाले
अरे प्यार ही करेंगे
जलने वाले चाहे
जल जल मरेंगे
दिल से जो धड़के हैं
वो दिल हरदम ये कहेंगे

प्रेम करणारे हे
प्रेम नेहमीच करतील
जळणारे हवं तर
जळून जळून मरतील
मने स्पंदती मनापासूनी
नेहमीच हे, म्हणतील की

ओ मेरे हमराही
मेरी बाँह थामे चलना
बदले दुनिया सारी
तुम न बदलना
प्यार हमे भी सिखला देगा
गरदिश में सम्भलना

ए सोबत्या माझ्या
माझा हात धरून चल तू
बदलो दुनिया सारी
मुळी ना बदल तू
प्रेम आपल्यालाही शिकवेल
संकटात सावरणे

दूरियाँ अब कैसी
अरे शाम जा रही है
हमको ढलते ढलते
समझा रही है
आती जाती साँस जाने
कब से गा रही है

दूरता ही कसली
जाते सांज ही ढळूनी
ढळता, ढळता आम्हाला
समजावत आहे ती
येते जाते श्वास न जाणो
गाती कधीपासूनी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.