२०२१-१०-०७

गीतानुवाद-१४४: मुझ को इस रात की

मूळ हिंदी गीतकारः शमीम जयपुरी, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः मुकेश
चित्रपटः दिल भी तेरा हम भी तेरे, सालः १९६०
भूमिकाः बलराज सहानी, उषा किरण, कुमकुम, धर्मेंद्र 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०७१२

धृ

मुझ को इस रातकी तनहाई में आवाज़ न दो
जिसकी आवाज़ रुला दे मुझे वो साज़ न दो

मला ह्या रात्रीच्या एकांती तू आवाज न दे
रडू फुटेल मला ज्याने तो तू साज न दे

मैंने अब तुम से न मिलने की कसम खाई है
क्या खबर तुमको मेरी जान पे बन आई है
मैं बहक जाऊँ कसम खाके तुम ऐसा न करो

तुला न भेटायची मी आता शपथ घेतली आहे
तुला काय माहित ती जीवावरच बेतली आहे
मी शपथ घेऊ आणि न पाळू, तू असे न कर

दिल मेरा डूब गया आस मेरी टूट गई
मेरे हाथों ही से पतवार मेरी छूट गई
अब मैं तूफ़ान में हूँ साहिल से इशारा न करो

जीव बुडला माझा, आशा माझी झाली निराश
माझ्या हातातुनच वल्ही माझी निसटून गेली
आता तुफानात मी, तीराहून तू संकेत न कर

रौशनी हो न सकी लाख जलाया हमने
तुझको भूला ही नहीं लाख भुलाया हमने
मैं परेशां हूँ मुझे और परेशां न करो

खूप उजळूनही उजेड होऊ शकला नाही
खूप विसरूनही तुज विसरू शकलो नाही
मी संत्रस्त आहे, आणखी तू त्रस्त न कर

किस कदर रोज़ किया मुझसे किनारा तुमने
कोई भटकेगा अकेला ये न सोचा तुमने
छुप गए हो तो कभी याद ही आया न करो

कसे दररोज मला टाळले आहेस ग तू
कुणी एकटा भटकेल हा न विचार केलास तू
लपली आहेस तर, कधी आठवूही नकोस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.