२०२१-१०-०६

स्तोत्रानुवाद-०४: आदि शंकराचार्यकृत प्रातःस्मरण

मराठी समश्लोकी (वसंततिलका) अनुवादः नरेंद्र गोळे २०२००४०९

प्रात: स्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं
सच्चित्सुखं परमहंसगतिं तुरीयम्
यत्स्वप्नजागरसुषुप्तिमवैति नित्यं
तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघ:

सत्त्वा सकाळि स्मरतो हृदि जागते जे
आनंद दे परमहंसपदी मिळे ते
निद्रेतही, सजगतेत, स्वप्नात जागे
ते मीच निष्कलंक ब्रम्ह, न पंचभूते

प्रातर्भजामि मनसा वचसामगम्यं
वाचो विभान्ति निखिला यदनुग्रहेण
यन्नेतिनेतिवचनैर्निगमा अवोचु-
स्तं देवदेवमजमच्युतमाहुरग्र्यम्‌

अर्चे सकाळि मनसा वचसा अगम्या
वाचा विलासत कृपाप्रसादे जयाच्या
वेदांत ज्यास म्हणती नच हे न दूजे
जे आदि देव अच्युतात्मक तत्त्व त्याला

प्रातर्नमामि तमस:परमर्कवर्णं
पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यम्
यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ
रज्ज्वां भुजंगम इव प्रतिभासितं वै

तेजा सकाळि नमु दिव्य, अंधार नाशी
जे वर्णतात पुरुषोत्तम पूर्ण अंशी
स्फूर्ती तयाचि करते जग भासमान
दोरी भुजंग ठरते जशि संशयानं

फल

श्लोकत्रयमिदं पुण्यं लोकत्रयविभूषणम्
प्रात:काले पठेद्यस्तु स गच्छेत्परमं पदम्

भूषणच तिन्ही लोकी असे हे श्लोक रोजची
सकाळी जो म्हणे जाय सर्वोच्चपदि तो सुखे

इति

श्रीमच्छंकरभगवत: कृतौ परब्रह्मण:
प्रात:स्मरणस्तोत्रं सम्पूर्णम्

अशाप्रकारे श्रीमच्छंकराचार्यकृत परब्रम्हाचे
प्रातःस्मरण संपूर्ण होत आहे

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.