२०२०-०८-२९

गीतानुवाद-१४९: न तुम हमें जानो

मूळ हिंदी गीतः मजरूह, संगीतकारः हेमंतकुमार, गायकः हेमंतकुमार, सुमन कल्याणपुर
चित्रपटः बात एक रात की, सालः १९६२, भूमिकाः देव आनंद, वहिदा रहमान 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००५०३

धृ

न तुम हमें जानो
न हम तुम्हे जानें
मगर लगता है कुछ ऐसा
मेरा हमदम मिल गया

न ओळखसी तू मला
न मीही ओळखत तुला
तरी वाटे जणू ऐसे
मला सहचर लाभला

ये मौसम ये रात चुप है
ये होंठों की बात चुप है
खामोशी सुनाने लगी, है दास्तां
नज़र बन गई है, दिल की ज़ुबां

हा ऋतूही न रात्र बोले
अधरही अबोल झाले
निरवताच सांगे, सारी कथा
नजर वैखरीच झाली माझी आता

मुहब्बत के मोड़ पे हम
मिले सबको छोड़ के हम
धड़कते दिलों का लेके, ये कारवां
चले आज दोनो, जाने कहाँ

प्रीतीच्या वळणावरी ज्या
भेटलो त्यजून जगा ह्या
स्पंदत्या मनांचा घेऊन हा काफिला
निघालो कुठे न जाणे, दोघे आता

 

https://www.youtube.com/watch?v=h_kFBR6V5gc

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.