२०२०-०८-३०

गीतानुवाद-१५०: मेरा दिल ये पुकारे आ जा

मूळ हिंदी गीतकार: राजेंद्र कृष्ण, संगीत: हेमंतकुमार, गायीका: लता
चित्रपट: नागिन, साल: १९५४, भूमिका: वैजयंतीमाला, प्रदीपकुमार

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६१२२२



धृ

मेरा दिल ये पुकारे आ जा
मेरे ग़म के सहारे आ जा
भीगा भीगा है समा, ऐसे में है तू कहाँ
मेरा दिल ये पुकारे आजा

माझे मन हे पुकारे राजा
दु:खसोबत्या माझ्या येऊन जा
सर्द सर्द ही हवा, मला ठाव तुझा वा
माझे मन हे पुकारे राजा



तू नहीं तो ये रुत
ये हवा क्या करूँ, क्या करूँ
तू नहीं तो ये रुत, ये हवा क्या करूँ
दूर तुझ से मैं रह के
बता क्या करूँ, क्या करूँ
सूना सूना है जहाँ, अब जाऊँ मैं कहाँ
बस इतना मुझे समझा जा

तू नाही तर हा ऋतू
ही हवा काय करू, काय करू
तू नाही तर हा ऋतू, ही हवा काय करू
तुझ्या पासून दूर
राहूनी काय करू, काय करू
वाटे खूप एकटे, आता जाऊ सांग कुठे
फक्त एवढे मला सांगून जा



आँधियाँ वो चलीं
आशियां लुट गया, लुट गया
आँधियाँ वो चलीं, आशियां लुट गया
प्यार का मुस्कुराता
जहाँ लुट गया, लुट गया
एक छोटी सी झलक
मेरे मिटने तलक
ओ चाँद मेरे दिखला जा

वादळे ही आली
ध्वस्त जग जाहले, जाहले
वादळे ही आली ध्वस्त जग जाहले
हासर्‍या प्रीतीचे
जगच संपले, संपले
मी मिटे तोपर्यंत
अल्पशी तव झलक
हे चंद्रा माझ्या देऊन जा



मुँह छुपा के मेरी
ज़िंदगी रो रही, रो रही
दिन ढला भी नहीं
शाम क्यों हो रही, हो रही
तेरी दुनिया से हम
ले के चले तेरा ग़म
दम भर के लिये तो आ जा

तोंड लपवून माझे
जीवनच रडतसे, रडतसे
दिवस ढळला न तरी
सांज का होतसे, होतसे
तुझ्या दुनियेतून मी
निघते दु:ख घेऊनी
क्षणभरच तरी येऊन जा

 

https://www.youtube.com/watch?v=mr_n9R3E_w4

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.