मूळ हिंदी गीतकार: केदार शर्मा, संगीत: रोशन, गायक: मुकेश
चित्रपट: बावरे नैन,
१९५०, भूमिका: राज कपूर, गीता बाली
मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६१२१८
॥
धृ
॥
|
तेरी दुनिया में दिल लगता नहीं
वापस बुला ले
मैं सजदे में गिरा हूँ
मुझको ऐ मालिक उठा ले |
तुझ्या दुनियेत मन नाही रमत,
वापस बोलाव रे
मी चरणी तव पातलो,
मला ए देवा उचल |
॥
१
॥
|
बहार आई थी किस्मत ने
मगर ये गुल खिलाया
जलाया आशियाँ सैय्याद ने
पर नोच डाले |
सुगी आली, नशीबाने
परंतु, पीक हे आले
निवारा जाळला व्याधाने,
कापून पंख टाकले |
॥
२
॥
|
भँवर का सर न चकराए
न दिल लहरों का डूबे
ये कश्ती आप कर दी मैने
तूफ़ां के हवाले |
गरगरे शिर न भोवर्याचे,
लहरींचे अंतरही न बुडे
ही होडी माझी मीच केली,
हवाले वादळाच्या ह्या |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.