२०१५-०५-२४

गीतानुवाद-०३९: ऐ दिल मुझे बता दे

मूळ हिंदी गीतकार: राजेंद्र कृष्ण, संगीत: मदनमोहन, गायिका: गीता दत्त
चित्रपट: भाई भाई, साल:१९५६, भूमिका: अशोककुमार, किशोरकुमार, निम्मी, श्यामा

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००९०१२२

धृ
ऐ दिल मुझे बता दे, तू किस पे आ गया है,
वो कौन है जो आ कर, ख्वाबों में छा गया है
मज सांग ए मना तू, मर्जी कुणावर आहे,
तो कोण असे जो येऊन, स्वप्नी विराजताहे
मस्तीभरा तराना, क्यों रात गा रही है,
आखों मैं नींद आ कर क्यों दूर जा रही है
दिल में कोई सितमगर अरमां जगा गया है, वो कौन है जो आ कर, ख्वाबों में छा गया है

मस्तीभरे हे गाणे का रात गातसे ही,
का झोप दूर जाते डोळ्यांत येऊनीही
अवखळ करून गेला, आशा उजागर आहे
तो कोण असे जो येऊन, स्वप्नी विराजताहे
बेताब हो रहा है, ये दिल मचल मचल के,
शायद ये रात बीते करवट बदल बदल के
ऐ दिल जरा संभल जा, शायद वो आ गया है,
वो कौन है जो आ कर, ख्वाबों में छा गया है
बेकाबू होत आहे, मन हे उचंबळून,
बहुतेक रात जाईल, कुशीवर वळू वळून
सावर जरा मना तू, बहुधा आलेला आहे,
तो कोण असे जो येऊन, स्वप्नी विराजताहे

भीगी हुई हवाए, मौसम भी है गुलाबी,
क्या चाँद क्या सितारे, हर चीज है शराबी
धीरे से एक नगमा कोई सुना गया है,
वो कौन है जो आ कर, ख्वाबों में छा गया है
सारी हवाच सर्द, ऋतू रंगला गुलाबी,
तो चंद्र, चांदणे ते, मयसृष्टी धुंद सारी
ऐकवून कुणी गेला, गाणे हळूच आहे,
तो कोण असे जो येऊन, स्वप्नी विराजताहे

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.