२०२१-०७-०९

गीतानुवाद-२१३: मेरे ख्वाबों में जो आये

मूळ हिंदी गीतः आनंद बख्शी, संगीतः जतीन-ललित, गायकः लता
चित्रपटः दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे, सालः १९९५, भूमिकाः शाहरुख खान, काजोल 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५१००१

धृ

मेरे ख्वाबों में जो आएँ
आ के मुझे छेड जाएँ
उससे कहो कभी सामने तो आएँ
मेरे ख्वाबों में जो आएँ
आ के मुझे छेड जाएँ
उससे कहो कभी सामने तो आएँ
मेरे ख्वाबों में जो आएँ

माझ्या स्वप्नांतून जो येई
येऊन मला चिडवून जाई
त्याला सांगा कधी समोर तर यावे
माझ्या स्वप्नांतून जो येई
येऊन मला चिडवून जाई
त्याला सांगा कधी समोर तर यावे
माझ्या स्वप्नांतून जो येई

कैसा हैं, कौन हैं, वो जाने कहाँ हैं
जिसके लिए मेरे होटों पे हाँ हैं
अपना हैं या बेगाना हैं वो
सच हैं या कोई अफसाना हैं वो
देखे घूर घूर के युँही दूर दूर से
उससे कहो मेरी निंद ना चुराएँ

कसा आहे, कोण आहे, न जाणे कुठे आहे
ज्याच्यासाठी माझ्या ओठांवर हो आहे
आपला आहे की परका आहे तो
खराच आहे की कथाभागच आहे तो
पाहे रोख रोखून, असाच दूर दूरून
त्याला सांगा माझी उडवू नको झोप रे

जादू सा जैसे कोई चलने लगा है
मैं क्या करूँ दिल मचलने लगा हैं
तेरा दिवाना हूँ कहता हैं वो
छुपछुप के फिर क्यूँ रहता हैं वो
कर बैठा भूल वो ले आया फूल वो
उससे कहो जाएँ चाँद लेके आएँ

जादू खरेच जणू होऊ लागली आहे
मी काय करू मनच उसळत आहे
तुझाच खुळा ग मी, म्हणतो तो आहे
लपूनछपून का मग राहतो तो आहे
आणले त्याने फूल आहे, केली ही चूक आहे
त्याला सांगा जाऊन चंद्र घेऊन यावे


https://www.youtube.com/watch?v=Zxgvob1Ew0c

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.