२०२१-०७-१२

गीतानुवाद-२१५: किसी राह मे किसी मोड पर

मूळ हिंदी गीतः आनंद बक्षी, संगीतः कल्याणजी आनंदजी, गायकः लता, मुकेश
चित्रपटः मेरे हमसफर, सालः १९७०, भूमिकाः जितेंद्र, शर्मिला टागोर 


मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२१०७१२

 

धृ

किसी राह मे किसी मोड पर
कहीं चल न देना तू छोड कर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर

 

 

कुठे वाटेवर कुठे वळणावर
सोडून नको जाऊस तू निघून
माझे सहचरा माझे सहचरा
माझे सहचरा माझे सहचरा

 

किसी हाल में किसी बात पर
कहीं चल न देना तू छोड कर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर

मु

 

कुठल्या स्थितीत कुण्या गोष्टीवर
सोडून नको जाऊस तू निघून
माझे सहचरे माझे सहचरे  
माझे सहचरे माझे सहचरे

मेरा दिल कहे कहीं ये न हो
नही ये न हो नहीं ये न हो
किसी रोज तुझसे बिछड के मै
तुझे ढुंडती फिरू दर बदर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर

 

माझे मन म्हणे कधी हे न हो
कधी हे न हो कधी ते न हो
कुण्या दिवशी सुटून तुझी साथ मी
दारोदार हुडकत फिरू मी तुज
माझे सहचरा माझे सहचरा
माझे सहचरा माझे सहचरा

तेरा रंग साया बहार का
तेरा रूप आईना प्यार का
तुझे आ नजर में छुपा लूं मै
तुझे लग न जाये कहीं नजर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर

मु

 

तुझा रंग बहारीची सावली
तुझे रूप प्रेमाचा आरसा
ये तुला नजरेत मी साठवू
तुला लागू नये कुणाची नजर
माझे सहचरे माझे सहचरे
माझे सहचरे माझे सहचरे

तेरा साथ है तो है जिंदगी
तेरा प्यार है तो है रोशनी
कहाँ दिन ये ढल जाये क्या पता
कहाँ रात हो जाये क्या खबर
मेरे हमसफर मेरे हमसफर
मेरे हमसफर मेरे हमसफर


मु

मु
दो

तुझ्या साथीनेच ही जिंदगी
तुझी प्रीत हाच प्रकाश की
कुठे मावळेल हा दिस ना कळे
कुठे होईल रात न मुळी कळे
माझे सहचरा/रे माझे सहचरा/ रे
माझे सहचरा/रे माझे सहचरा/ रे

 

https://www.youtube.com/watch?v=N2RXpMC-1r8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.