२०२०-०७-१२

गीतानुवाद-१४२: यारी है ईमान मेरा

आज प्राणकिशन सिकंद ( जन्म १२ फेब्रुवारी १९२०मृत्यूः १२ जुलै २०१७ ) ह्यांचा स्मृतीदिन आहे.
ह्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीस हा अनुवाद सादर समर्पित!

मूळ हिंदी गीतः गुलशन बावरा, संगीतः कल्याणजी-आनंदजी, गायकः मन्ना डे
चित्रपटः जंजीर, सालः १९७३, भूमिकाः प्राण, अमिताभ बच्चन

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००७१२

प्र
स्ता
ग़र ख़ुदा मुझसे कहे
ग़र ख़ुदा मुझसे कहे
कुछ मांग बन्दे मेरे
मैं ये माँगू
मैं ये माँगू
महफिलों के दौर यूँ चलते रहें
हमपे आलाव, हमने वालाव
हमसफ़र, हमराज़ हो
ता क़यामत
ता क़यामत
जो चिराग़ों की तरह जलते रहें

जर मला ईश्वर विचारे
जर मला ईश्वर विचारे
काही माग हे वत्सा माझ्या
मी हे मागेन
मी हे मागेन
मैफलींचे सोहळे चालत असोत
पाहुणे असोत, घरचे असोत
सोबती, सांगातीही असोत
कल्पांतापर्यंत
कल्पांतापर्यंत
जे दीपापरी उजळत राहतील

धृ
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी
अरे यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी
प्यार हो बन्दों से ये
प्यार हो बन्दों से ये
सबसे बड़ी है बंदगी
यारी है
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी

मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी
अरे मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी
प्रेम असो सार्यांशी
प्रेम असो सार्यांशी
ही सर्वात मोठी देणगी
मित्रता
मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी
अरे मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी

साज़--दिल छेड़ो जहां में
साज़--दिल छेड़ो जहां में
प्यार की गूँजे सदा
साज़--दिल छेड़ो जहां में
प्यार की गूँजे सदा
जिन दिलों में प्यार है
उनपे बहारें हों फ़िदा
प्यार लेके नूर आया
प्यार लेके नूर आया
प्यार लेके सादग़ी
यारी है
अरे यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी

हृदयसंगीत राहो खुलत
हृदयसंगीत राहो खुलत
प्रेमाचा होऊ दे गजर
हृदयसंगीत राहो खुलत
प्रेमाचा होऊ दे गजर
ज्या मनांतून प्रीत आहे
बहार त्यावरती नजर
प्रेम घेऊन तेज आले
प्रेम घेऊन तेज आले
साधेपणा लेऊनही
मित्रता
मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी
अरे मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी

जान भी जाए अगर
जान भी जाए अगर
यारी में यारों ग़म नहीं
जान भी जाए अगर
यारी में यारों ग़म नहीं
अपने होते यार हो
ग़मग़ीन मतलब हम नहीं
हम जहाँ हैं उस जगह
हम जहाँ हैं उस जगह
झूमेगी नाचेगी ख़ुशी
यारी है
अरे यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी

जीवही गेला जरी
जीवही गेला जरी
मैत्रीत ना मुळी खेद हो
जीवही गेला जरी
मैत्रीत ना मुळी खेद हो
राहून मित्र आम्ही जर
हो दुःख, तर आम्ही नसू
आम्ही राहू त्या स्थळी
आम्ही राहू त्या स्थळी
नाचेल गाईल जिंदगी
मित्रता
मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी
अरे मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी

गुल--गुलज़ार क्यों बेज़ार नज़र आता है
गुल--गुलज़ार क्यों बेज़ार नज़र आता है
चश्म--बद का शिकार यार नज़र आता है
छुपा ना हमसे, ज़रा हाल--दिल सुना दे तू
तेरी हँसी की क़ीमत क्या है, ये बता दे तू
तेरी हँसी की क़ीमत क्या है, ये बता दे तू
कहे तो आसमां से चाँद तारें ले आऊँ
हसीं जवान और दिलकश नज़ारे ले आऊँ
है है कुर्बान
तेरा म्नू हूँ
तेरा म्नू हूँ
तूने निभाया याराना
तेरी हँसी है आज सब से बड़ा नज़राना
तेरी हँसी है आज सब से बड़ा नज़राना
यार के हँसते ही
यार के हँसते ही
महफ़िल पे जवानी गई
  गई
यारी है
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी
यारी है ईमान मेरा यार मेरी ज़िन्दगी
कुर्बान, कुर्बान, कुर्बान

उपवनी फूल का हैराण दिसत आहे हे
उपवनी फूल का हैराण दिसत आहे हे
दृष्ट जणू लागली मित्रा असे दिसते आहे
लपवू नकोस, तुझे हाल मला सांग रे तू
तुझ्या स्मिताची किंमत मला सांग रे तू
तुझ्या स्मिताची किंमत मला सांग रे तू
म्हणसी तर चंद्र तारे आणू का मी
चित्तखेचक बहारी सांग का घेऊन येऊ
है है कुर्बान
तुझा आभारी मी
तुझा आभारी मी
तू राखली मैत्री पुरी
तुझे हे हास्य आहे थोर आज नजराणा
तुझे हे हास्य आहे थोर आज नजराणा
हासता मित्रही
हासता मित्रही
मैफील रंगीत जाहली
जाहली
मित्रता
मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी
अरे मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी
अरे मित्रता हे ब्रीद माझे मित्रता ही जिंदगी
कुर्बान, कुर्बान, कुर्बान





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.