२०२०-०७-०५

गुरू स्तवन- गुरूस्तोत्राचा मराठी अनुवाद


गुरू स्तवन

गुरूस्तोत्राचा मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००७०३

अखंडमंडलाकार, व्यापतो जो चराचर ।
जो दाखवीत हे सारे, वंदितो गुरूला अशा ॥ १ ॥

अज्ञाने अंध झालेले, ज्ञानांजन शलाकेने ।
उघडी जो चक्षू माझे, वंदितो गुरूला अशा ॥ २ ॥

गुरू ब्रम्हा, गुरू विष्णू, गुरू देव महेश्वर ।
गुरू तोच परब्रम्ह, वंदितो गुरूला अशा ॥ ३ ॥

स्थावर जंगमा व्यापे, संवेदी जो चराचर ।
जो जाणवीत हे सारे, वंदितो गुरूला अशा ॥ ४ ॥

सौरभे व्यापि जो सारे त्रिलोकीचे चराचर ।
जो अनुभवु देई हे, वंदितो गुरूला अशा ॥ ५ ॥

श्रुतींच्या शिरिच्या सर्व रत्नांनी राजती पदे ।
वेदांत पद्मि जो सूर्य, वंदितो गुरूला अशा ॥ ६ ॥

चैतन्य शाश्वत शांत आकाशांत निरंजन ।
बिंदू नाद कला पार, वंदितो गुरूला अशा ॥ ७ ॥

ज्ञान शक्तीवरी स्वार तत्त्वमाळेनी भूषित ।
भोग दे मोक्ष देई जो, वंदितो गुरूला अशा ॥ ८ ॥

अनेक जन्म प्राप्तीचे जाळी जो कर्मबंध तो ।
देऊनी आत्म ज्ञानास, वंदितो गुरूला अशा ॥ ९ ॥

शोषुनी भव सिंधूला, देई जो सार संपदा ।
गुरू जो तीर्थ रुपाने, वंदितो गुरूला अशा ॥ १० ॥

गुरूहूनी नसे थोर, तत्त्व वा तप कोणते ।
तत्त्वज्ञानी गुरू थोर, वंदितो गुरूला अशा ॥ ११ ॥

माझा नाथ जगन्नाथ, गुरू माझा जगद्गुरू ।
माझा आत्मा जगदात्मा, वंदितो गुरूला अशा ॥ १२ ॥

गुरू आदी, अनादीही, गुरूच थोर दैवत ।
गुरूहून नसे थोर, वंदितो गुरूला अशा ॥ १३ ॥

आईहि तू बापहि तूच तूची । तू भाउही मित्रहि तूच तूची ।
विद्याहि तू द्रव्यहि तूच तूची । आहेस तू सर्वची देवदेवा ॥ १४ ॥ 

॥ श्री गुरू स्तवन समाप्त ॥

मूळ संस्कृतः

गुरुस्तोत्र

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १ ॥

अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ २ ॥

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ३ ॥

स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित्सचराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ४ ॥

चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ५ ॥

सर्वश्रुतिशिरोरत्नविराजितपदाम्बुजः ।
वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ६ ॥

चैतन्यश्शाश्वतश्शान्तः व्योमातीतो निरञ्जनः ।
बिन्दुनादकलातीतः तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ७ ॥

ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमालाविभूषितः ।
भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ८ ॥

अनेकजन्मसम्प्राप्तकर्मबन्धविदाहिने ।
आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ९ ॥

शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः ।
गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १० ॥

न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।
तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥ ११ ॥

मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ।
मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १२ ॥

गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।
गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥ १३ ॥

त्वमेव माता च पिता त्वमेव । त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ १४ ॥

॥ इति श्रीगुरुस्तोत्रम् ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.