२०२०-०७-०५

१९४७ मध्ये ज्यांचेमुळे लडाख वाचले ते लोक


१९४७ मध्ये ज्यांचेमुळे लडाख वाचले ते लोक

लेखकः ब्रिगेडिअर हेमंत महाजन, युद्धसेवामेडल

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००६२८

येथील जमीन नापीक असून, खिंडी एवढ्या उंच आहेत की, केवळ उत्तम मित्र किंवा भयंकर शत्रूच इथे येऊ इच्छितील. – एक लडाखी म्हण

भारत आणि चीन ह्यांच्या दरम्यान लडाखवरून निर्माण झालेला वाद सुरूच आहे. भारताच्या नकाशातील मुकूट, मध्य आशियातून लेहशी होणार्‍या वस्तुविनिमय (बार्टर) व्यापार करणार्‍यांच्या दळणवळणाचा मार्ग होता. सिंधू, झांस्कर आणि शायॉक नद्यांच्या खोर्‍यांतून; १८,००० फुटांहून अधिक उंचीच्या, लगतच्या पर्वतांतून, नैसर्गिक मार्ग तयार झालेले होते. रेशीममार्गापासून फारकत घेऊन सार्थवाहांचे जत्थे चीनी तुर्कीस्तानमधून काराकोरम खिंड पार करून शायॉक नदीच्या खोर्‍यातून लेहपर्यंत आणि नंतर सिंधू खोर्‍यातून लेहच्या पश्चिमेकडील स्कार्डू आणि गिलगिटपर्यंत जात असत. ह्या मार्गावरून दक्षिणेकडे वळल्यास कारगील आणि जोझिला पार करून श्रीनगरपर्यंत जात असत. लेहच्या आग्नेयेस रोहतांग खिंडीद्वारे मनालीपर्यंत पोहोचत असत. समुद्रसपाटीपासूनची खूप जास्त असलेल्या उंचीवरील ही थंड मरूभूमी सरासरीने ११,००० फूट उंचीवर, लडाखपासून पश्चिमेकडे जाणार्‍या सिंधू खोर्‍यावर वसलेली आहे.

१८४५-४६ च्या ब्रिटिश-शिख युद्धानंतर आणि १८४६ च्या अमृतसर करारानंतर लडाख, बाल्टिस्थानसहितच्या जम्मू आणि काश्मीरवर महाराजा गुलाबसिंह ह्यांनी ताबा मिळवला होता. अफगाणिस्तान आणि रशियाच्या सीमांशी जोडलेले असल्याने ब्रिटिशांना बाल्टिस्थानमध्ये व्यूहरचनात्मक स्वारस्य होते. त्यामुळे ह्या भागात कायमच त्यांचा हस्तक्षेप होत राही. ह्याचे पर्यवसान, नगर, हुंझा, गिलगिट आणि स्कार्डूची संपूर्ण भूमी महाराजांनी ब्रिटिशांना १९३५ मध्ये ६० वर्षांकरता भाड्याने देण्यात झाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांचे सार्वभौमत्व संपुष्टात आल्याने, हा प्रदेश तांत्रिकदृष्ट्या आणि कायदेशीरपणे ३० जून १९४७ रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाला.

ब्रिटिश पॉलिटिकल एजंटाने, जम्मू आणि काश्मीरच्या महाराजांनी नियुक्त केलेल्या गिलगिटच्या गव्हर्नरांच्या हाती ३० जून १९४७ रोजी, हा प्रदेश सुपूर्त केला. ह्या वेळी निर्णयातील एका घातक चुकीच्या स्वरूपात, महाराजांनी गिलगिट स्काऊटच्या आदेशकांसहित ब्रिटिश अधिकारी तसेच ठेवले. ह्या अधिकार्‍यांनी ३१ ऑक्टोंबर १९४७ रोजी कट करून गव्हर्नरांना कैदेत टाकले. मेजर ब्राऊन ह्यांनी ०३ नोव्हेंबर १९४७ रोजी पाकिस्तानी झेंडा फडकावला आणि प्रशासन पाकिस्तान्चे हाती सुपूर्त केले.

डिसेंबर १९४७ पर्यंत स्कार्डू येथील छोटे पथक ताब्यात घेतले गेले आणि आदिवासींशी  संगनमत करून, राज्यातील इतर भागांवर पाकिस्तानने ताबा मिळवला. पाकिस्तान समर्थित आदिवासी शायॉक आणि सिंधू खोर्‍यांपर्यंत पुढे आले. त्यांचे उद्दिष्ट लेह आणि अंतीमतः संपूर्ण लडाखवर कब्जा करण्याचे होते. लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा ह्यांच्या नेतृत्वाखालील, राज्याच्या सैन्यातील, स्कार्डूच्या पथकाने सहा महिने किल्ला लढवला. लेहपर्यंतची त्यांची प्रगती प्रलंबित करण्यात ह्यामुळे मोलाची मदत झाली.

लेह येथे राज्याच्या सैन्याच्या ३३ माणसांच्या एका प्लॅटूनचे संरक्षण होते.

त्यास कुमक देण्याची इतर कोणतीच शक्यता नसल्याने, मेजर पृथ्वीचंद आणि कॅप्टन खुशालचंद  २ डोग्रा आणि राज्याच्या सैन्याच्या २ प्लॅटून्स ह्यांना घेऊन १६ फेब्रुवारी १९४८ रोजी श्रीनगरहून जोझिला मार्गे पायीच रवाना झाले. बहुधा हिवाळ्यात ते प्रथमच असे करत होते. ब्रिटिशांकरवी प्रशिक्षित लडाखचे पहिले अभियंत्रज्ञ सोनम नोर्बू हेही त्यांचेसोबत होते. लेह येथे धावपट्टी तयार करण्यासाठी त्यांचेपाशी रु.१३,०००/- दिलेले होते. ८ मार्च १९४८ रोजी ते लेहला जाऊन पोहोचले. कुमक देण्याचा पर्यायी मार्ग रोहतांग खिंडीमार्गे मनालीहून होता. पण तो खूपच लांबचा होता आणि पायी पार करण्यास योग्य नव्हता. तोही हिवाळ्यात अनुल्लंघनीय होतच असे.

मेजर पृथ्वीचंद ह्यांनी ७-जे.अँड.के. मिलिशिया उभारण्यास सुरूवात केली. त्यात चेवांग रिंचेन नावाचा एक तरूण होता. पुढे जाऊन तो कर्नल चेवांग रिंचेन, महावीरचक्र अँड बार, सेना मेडल झाला.

सिंधू खोर्‍याचा तळ आणि शहर ह्यांच्या दरम्यान धावपट्टी बांधण्याचे काम १२ मार्च १९४८ रोजी सुरू झाले. ६ एप्रिल १९४८ रोजी अत्यंत परीश्रमपूर्वक २,३०० यार्डांची धावपट्टी बांधून तयार झालेली होती. कोणत्याही पट्टीने हे काम अपवादात्मक श्रेयाचे होते. नोर्बू ह्यांनी रु.१०,८९१/- खर्चले होते. उर्वरित रु.२,१०९ त्यांनी अधिकोशात जमा केले. ६ एप्रिल १९४८ रोजी त्यांनी एक बिनतारी संदेश पाठवला. विमाने आणि कुमक आता लगेचच पाठवू शकता, अशी विनंती करणारा.

२२ मे १९४८ पर्यंत सिंधू खोर्‍यातील लेहच्या बाहेरील भागातील जोझिला, कारगील, खाल्तसी आणि थारू ह्यावर पाकिस्तानी आक्रमकांनी ताबा मिळवलेला होता. श्रीनगरपासूनचा खुष्कीचा मार्ग आता उपलब्ध नव्हता. शत्रू लेहच्या दरवाजावर उभा होता. कुमक पुरवण्याचा इतर कोणताही उपाय उपलब्ध नव्हता. लेह आता केवळ हवाई मार्गानेच वाचवता येणार होते.

मेजर जनरल थिमय्या ह्यांनी एअर कमोडोर मेहरसिंग, आदेशक, वायूदल, जे.अँड.के. ह्यांना मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात पाचारण केले. लेहची सुटका करण्यास मदत करण्याची विनंती केली. मेहरसिंग ह्यांनी स्पष्ट केले की, डाकोटा मालवाहू विमाने इतक्या उंचीवर चालवण्याकरता अभिकल्पित नाहीत. ती दाबितही नाहीत. त्यांत चालनपथकासाठी प्राणवायू नेण्याची सोयही नाही. त्याची १८,००० फूटाहून अधिक उंचीवर उडण्याची क्षमताही मर्यादितच आहे. मार्गावरील हवामानाची माहिती नाही आणि तीचे भाकीतही केले जाऊ शकत नाही. त्यावेळी वायूदलाकडे मालवाहू डाकोटा विमानाचे केवळ एकच स्क्वाड्रोन होते. ते काश्मीर आणि पूँछ भागातील इतर मार्गावरही वापरले जातच होते. त्यावर थिमय्या ह्यांनी पहिल्या विमानासोबत स्वतः जाण्याची आणि वायूदलासोबत धोका पत्करण्याची तयारी दर्शवली. त्यावर मेहरसिंग तयार झाले एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतःच पहिले विमान लेहला नेण्याचा निर्णय घेतला. हा त्या दोघांमधला करार होता. त्यास मुख्यालयाकडून कोणत्याही प्रकारची अनुमती प्राप्त झालेली नव्हती.

लेहची धावपट्टी ११,००० फुटांवर होती. त्या वेळेपर्यंत कुणीही मालवाहू विमान अशा उंचीवर उतरवलेले नव्हते. धावपट्टी एका नरसाळ्यात अशी आखलेली होती, की त्यावर एकाच बाजूने विमान आणता आणि उतरवता यावी. दुसर्‍या बाजूला असलेल्या टेकडीमुळे, अडचणीच्या प्रसंगीही त्या बाजूने येण्याचा प्रश्नच नव्हता. थोडक्यात काय तर पहिल्याच प्रयत्नात विमान नीट उतरले पाहिजे होते. प्राणवायूचे उपस्कर नव्हते. नकाशे नव्हते. दिग्दर्शन सुविधांची सोय नव्हती. धावपट्टीबाबतचा पूर्वानुभव नव्हता. मेहरसिंग ह्यांनी २४ मे १९४८ रोजी उड्डाण भरले. विमानात त्यांचेसोबत फ्लाईट लेफ्टनंट एस.डी.सिंग आणि जनरल थिमय्या होते. प्रथम १८,००० फुट उंचीवर जाणे आणि नंतर जोझि-ला, नामिक-ला आणि फोटू-ला ह्या खिंडी पार करत ते लेहला उतरले. वायूमार्गे प्रवासाचा एक इतिहासच घडत होता.

नंतरच्या सहा दिवसपर्यंत हवामान उड्डाणास सोयीचे नव्हते. ३१ मे रोजी केलेला एक प्रयासही, खराब हवामानापायी अपयशीच राहिला.

नंतर १ जून रोजी एअर कमोडोर मेहरसिंग हे सहा डाकोटा विमानांचे एक पथकच घेऊन गेले. त्यात २/४ गुरखा रायफल्सची एक कंपनी होती. आवश्यक सामान आणि दारुगोळाही होता. धावपट्टीनजीकच हे सर्व सामान खाली टाकूनच एअर कमोडोर मेहरसिंग ह्यांनी धावपट्टीवर पहिले विमान उतरवले. इतर विमानेही मग त्याचप्रमाणे आली. लेहला कुमक मिळाली. उतरल्यावर ताबदतोब गुरखा कंपनीने आक्रमकांना पकडण्यासाठी पश्चिमेकडे कूच केले. स्थानिक लोकांनी स्वयंचलित वाहन ह्यापूर्वी कधीही पाहिलेले नव्हते. मग विमान पाहणे तर सोडूनच द्या. त्यांनी तत्परतेने ’उडत्या घोड्यांकरता’ चारा आणला! प्रचलित मान्सूनकाळात त्यानंतर हा हवाई मार्गही प्रस्थापित करण्यात आला होता.

जोझिला, द्रास आणि कारगील शत्रूच्या हाती गेले होते. खुष्कीचा केवळ एकच मार्ग आता आपल्याला उपलब्ध होता. तो म्हणजे रोहतांग खिंडीवाटे मनालीपर्यंतचा. हे अंतर ४७५ किलोमीटरचे होते. मेजर हरिचंद ह्यांच्या नेतृत्वाखालील २/८ गुरखा रायफल्स कंपनीस २८ मे १९४८ रोजी फिरोझपूरहून मनालीपर्यंत हलवण्यात आले. १५१ सैनिक, ६०० रयफल्स आणि दारुगोळा ह्यांसह ती कंपनी सर्व उपलब्ध हमाल आणि घोडे ह्यांना घेऊन निघाली. १७,००० फूट उंच चढून; बारालचा, लाचुलुंग आणि टँगलांग खिंडी पार करत, ५ जुलै १९४८ रोजी लेहला पोहोचली.

आदेशक अधिकारी लेफ्टनंट कर्नल एच.एस.परब ह्यांच्या नेतृत्वाखालील २/८ गुरखा रायफल्स कंपनी फिरोझपूरहून श्रीनगरला १७ ऑगस्त रोजी हलवण्यात आली. आदेशक अधिकारी आणि कांपनीस हवाईमार्गे २३ ऑगस्त रोजी लेहला नेण्यात आले. उर्वरित बटालियन पायीच रोहतांग खिंड चढून १८ सप्टेंबर रोजी लेहला पोहोचली. हवाईमार्गे नेण्यापूर्वी लेफ्टनंट कर्नल परब ह्यांना लडाखचे लष्करी गव्हर्नर नियुक्त करण्यात आले होते. जनरल थिमय्या ह्यांचा त्यांचे हुकूम होता, “तुम्ही कोणत्याही किंमतीत लेहचे संरक्षण करा”. येताच, त्यांनी लडाखमधील सर्व सैनिकांच्या आदेशकपदाची सूत्रे हाती घेतली आणि आक्रमकांना मागे हटवण्याकरता कूच केले.

आणखी कुमक (रि-एन्फोर्समेंटस) आणि रसद (सप्लाईज) त्यानंतर वायूमार्गे उतरवली गेली किंवा रोहतांग खिंडीमार्गे पायी पोहोचवण्यात आली. लेह वाचवण्यात आले. शत्रू नंतर मागे हटवला गेला. १ नोव्हेंबर १९४८ रोजी जोझिला ताब्यात आली आणि २३ नोव्हेंबर १९४८ रोजी कारगील. कर्नल परब ह्यांचे सैनिक लेहपासून पुढे सरकतच होते. जोझिलाकडून येणार्‍यांना ते २४ नोव्हेंबर १९४८ रोजी जाऊन मिळाले. सिंधू नदीच्या खोर्‍यातून आणखी पश्चिमेकडचे कूच हिवाळा सुरू होत असल्याने थांबवण्यात आले. १ जानेवारी १९४९ रोजी युद्धबंदी झाली.

ह्या धाडसी लोकांनी लडाख वाचवले

सोनम नोर्बू ह्यांनी पुढे जे.अँड.के. सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता म्हणून काम केले. सीमावर्ती रस्ते संघटने (बॉर्डर रोड ऑर्गनाझेशन) सोबत मिळून त्यांनी श्रीनगर-लेह रस्ता बांधण्यात मोलाची भूमिका निभावली. एअर कमोडोर मेहरसिंग ह्यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले. ऑगस्त १९४८ मध्ये वायूदलातून त्यांनी राजीनामा दिला आणि नंतर ११ मार्च रोजी  विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. जनरल थिमय्या पुढे चीफ-ऑफ-आर्मी स्टाफ झाले. लेफ्टनंट कर्नल शेर जंग थापा ह्यांना स्कार्डूचा बचाव केल्याखातर महावीर चक्र प्रदान करण्यात आले. मेजर हरीचंद आणि कॅप्टन खुशालचंद ह्यांनाही, अंतीमतः लेहची सुटका आणि संरक्षण पूर्नत्वास जाईपर्यंत शत्रूला दूरच ठेवण्यात त्यांनी दाखवलेल्या शौर्याकरता महावीर चक्र प्रदान करण्यात आले. चेवांग रिंचेन ह्यांनाही महावीर चक्र प्रदान करण्यात आले. त्यांनी त्यांच्या सैनिकांचे नेतृत्व करत १९७१ मध्ये टुर्टुकवर ताबा मिळवला होता त्याकरता त्यांना महावीरचक्रावर एक बारही प्रदान करण्यात आला. इतर सैनिक फारसे चमकले नाहीत.

लेहच्या बाह्य सीमेवरील एका भूभागावर कुंपण घातलेले आहे. तिथे डझनभरांहून जास्त थडगी आहेत. बाजूने जाणार्‍याचे तिकडे क्वचितच लक्ष जाते. ती ह्या लढाईत जीव गमावलेल्या काही सैनिकांची स्मारके आहेत. त्यांची नावेही अज्ञात असली तरी त्यांनीही लडाख वाचविण्यात मदत केलेली आहे.

मूळ इंग्रजी लेखः 

The Men Who Saved Ladakh in 1947

The land is so barren and the passes so high that only the best of friends or fiercest enemies would want to visit us. – A Ladhakhi saying

The Ladakh standoff between the Chinese and Indian army continues. Ladakh, the crown on India’s map, was the transit route of trading caravans to and from Central Asia with Leh as the communication and barter hub. The three valleys formed by the Indus, Zanskar and Shyok rivers provided the natural routes amidst mountains towering upto 18000 feet. Branching off from the Silk Route, caravans from Chinese Turkistan crossed over the Karakoram Pass moving along the Shyok River and onto Leh and thene along the Indus to Skardu and Gilgit West of Leh. Branching off Southwards from this route was Kargil and and across the Zojila to Srinagar. Towards the South East Leh was connected to Manali over the Rohtang Pass. The high altitude cold desert averages 11000 feet along the Indus which runs through Ladakh from East to West.

Following the Anglo Sikh War 1845-46 and the Treaty of Amritsar 1846, Jammu and Kashmir, including Ladakh and Baltistan was acquired by Maharaja Gulab Singh. British strategic interest in Baltistan bordering Afghanistan and Russia ensured constant interference in this region culminating in the entire region of Nagar, Hunza, Gilgit and Skardu being leased by the Maharaja to the British in 1935 for 60 years. With the impending lapse of British Paramountcy on 15 August 1947, the region was to technically and legally revert to Jammu and Kashmir State on that date.

It was handed over by the British Political Agent to the Governor of Gilgit appointed by the Maharaja of Jammu and Kashmir on 30 June 1947. In a grave error of judgment, the British officers including the commander of the Gilgit Scouts, were retained by the Maharaja. A coup was staged by these officers on 31 October 1947 and the Governor imprisoned. Major Brown hoisted the Pakistani flag on 03 November 1947 and handed over the administration to Pakistan.

By Dec 1947 the small garrison at Skardu was besieged and in concert with the tribal invasion of other parts of the state, Pakistan aided tribals had advanced up the Shyok and Indus Valleys, the objective being Leh and ultimately entire Ladakh. The garrison at Skardu under Lieutenant Colonel Sher Jang Thapa of the State Forces held out for six months which proved crucial in delaying the enemy advance towards Leh.

Leh at that time was garrisoned by a platoon of 33 men of the State Forces.

With no other means available to reinforce the garrison, Major Prithi Chand and Captain Khusal Chand with a company of 2 Dogra and two platoons of the State Forces set out from Srinagar on 16 Feb 1948, across the Zojila on foot crossing it in winters perhaps for the first time. They were accompanied by the British trained Sonam Norbu, the first engineer from Ladakh. He carried Rs 13,000/- for constructing an airstrip at Leh. The party reached Leh on 08 March 1948. The alternate route for reinforcements was from Manali over the Rohtang Pass which was too long and only negotiable on foot. It too was impassable in the winters.
Major Prithi Chand commenced raising 7 J&K Militia amongst whom was a young man named Chewang Rinchen – later Colonel Chewang Rinchen, Maha Vir Chakra and Bar, Sena Medal.

Construction of the airstrip between the Indus river bed and the town commenced on 12 Mar 1948 and a 2300 yards long makeshift airstrip was ready by 6 April 1948 through sheer physical labour. It was an outstanding achievement by any standard. Norbu had spent Rs 10891/- and deposited the balance amount of Rs 2109 -in the treasury. On 6 April 1948 he sent a wireless message requesting dispatch of aircraft and reinforcements immediately.
By 22 May 1948, Zojila, Kargil and Khaltsi and Tharu – along the Indus – on the outskirts of Leh, had been captured by the Pakistani raiders. The land route from Srinagar was no more available. The enemy was at the gates of Leh. With no other means of reinforcing available, Leh could only be saved by an air link.

Major General Thimayya invited Air Commodore Mehar Singh, commanding the Air Force in J&K, in the third week of May to urge Mehar Singh to help relieve Leh, Mehar Singh explained that the Dakota transport aircraft were not designed to operate at such altitudes. They were not pressurized, had no oxygen for the crew and limited power to fly over the 18000 foot high mountains. The weather enroute was unknown and unpredictable. The Air Force then had only one squadron of Dakota transport aircraft and was very heavily committed in ongoing operations in Kashmir and Punch. Thimayya then offered to go along with the first aircraft and share the risks with the Air Force. Mehar Singh not only relented but also decided to personally pilot the first aircraft to Leh. It was a mutual agreement between the two with no clearance from higher headquarters.

The airstrip at Leh was at approximately 11000 feet. No one had landed transport aircraft at such altitudes at that time. The airfield was aligned in a bowl with only one direction for approach and landing. The hills on the other side precluded any scope for ‘going around’ in case the approach was not right – in short it had to be right the first time. With no oxygen equipment, no maps, no navigation aids and no prior familiarization with the landing strip, Mehar Singh took off in a Dakota on 24 May 1948 with Flight Lieutenant SD Singh and with General Thimayya on board. Flying above 18000 feet and after negotiating the Zojila, Namikla and Fotula they landed at Leh. Aviation history had been created.

The weather did not permit flying for the next six days. An attempt on 31 May was frustrated by bad weather.

Then on 01 June Air Commodore Mehar Singh led a flight of six Dakotas with a company of 2/4 Gurkha Rifles along with essential supplies and ammunition. After dropping the stores near the airfield Air Commodore Mehar Singh landed the first aircraft. The others followed. Leh had been reinforced. Immediately on landing the company of Gurkhas pushed westwards to hold the raiders. The local population had not seen a motor vehicle leave alone an aircraft and hurriedly brought fodder for the ‘flying horses’! A air bridge in the prevailing monsoon conditions was thereafter established.

As Zojila, Dras and Kargil were in enemy hands, the only land route available was from Manali over the Rohtang Pass.  A distance of over 475 km. A company of 2/8 Gurkha Rifles under Major Hari Chand was moved from Ferozepur to Manali on 28 May 1948. The company consisting of 151 men and carrying 600 rifles with ammunition and supplies set out on foot with all available porters and ponies. After traversing the over 17000 foot high Baralacha, Lachulung and Tanglang passes, the column reached Leh on 05 July 1948.
One company of 2/8 Gurkha Rifles under the commanding officer, Lt Col HS Parab, was moved from Ferozepur to Srinagar on 17 August. The Commanding Officer and the company were airlifted to Leh on 23 August. The remainder battalion moved on foot across the Rohtang pass reaching Leh on 18 September. Before being airlifted Colonel Parab had been appointed the Military Governor of Ladhak. His orders from General Thimayya were ‘You will defend Leh at all cost’. On arrival he assumed command of all troops in Ladhak and set about pushing the raiders back.

Further reinforcements and supplies were thereafter air landed and carried across Rohtang on foot. Leh was saved and the enemy eventually pushed back. Zojila was captured on 01 Nov 1948 and Kargil on 23 Nov 1948. Colonel Parab’s troops advancing from Leh linked up with those advancing from Zojila on 24 November 1948. Further advance westward along the the Indus was stalled by the winters setting in. The cease fire followed on 01 January 1949.

Ladhak had been saved by these intrepid men

Sonam Norbu later joined the J&K PWD and as Chief Engineer with the Border Roads Organization was instrumental in the construction of the Srinagar – Leh road. Air Commodore Mehar Singh was awarded the Maha Vir Chakra. He resigned from the Air Force in Aug 1948 and died in an air crash on 11 March 1952. General Thimayya went on to on to become the Chief of the Army Staff. Lt Col Sher Jang Thapa was awarded the Maha Vir Chakra for the defence of Skardu. Major Hari Chand and Captain Khusal Chand were awarded the Maha Vir Chakra for their gallant actions in keeping the raiders at bay till Leh was finally relieved and secured.  Chewang Rinchen was also awarded the Maha Vir Chakra. He led his troops in the capture of Turtuk in 1971 and was awarded a Bar to the Maha Vir Chakra. The other soldiers faded away.

In a small plot on the outskirts of Leh is an enclosed compound with a dozen odd graves. Those passing by barely notice the compound. There lie some of those killed during the operations. Unsung, they too had helped save Ladakha.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.