२०२०-०७-०४

गलवान खोर्‍यातील १५ जूनची चकमक


गलवान खोर्‍यातील १५ जूनची चकमक

लेखकः ब्रिगेडिअर हेमंत महाजन, युद्धसेवामेडल

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२००६२७

लष्करातील अनेक मित्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा लेख लिहिलेला आहे. युद्धकालीन माहितीच्या धुराळ्यात खूपशी अवास्तव माहिती उडत राहते. माहिती नसलेले आणि स्वयंशैलीचे संरक्षण तज्ञ, तसेच राजकीय नेते नेहमीच असत्य वक्तव्ये प्रसृत करत असतात. ह्यांपैकी काही तथाकथित तज्ञांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात किंवा सेवाकाळात कधी उंच पर्वतीय प्रदेश बघितलेलाही नसतो. मात्र खोटे बोलण्याकरता त्यांना दूरदर्शन वाहिन्यांवर यायचेच असते. भारतीय चीनी सैनिकांत पूर्व लडाखमधे १५ १६ जून २०२० रोजी झालेल्या लढाईबाबतही असेच झाले.

गलवान नदीच्या खोर्यातच १९६२ च्या युद्धासही तोंड फुटलेले होते. त्यांच्या १९५९ च्या दावारेषेत चीनने, गलवान शायॉक नद्यांच्या संगमापर्यंतच्या संपूर्ण खोर्यावर दावा केलेला होता. झिंझिआंग आणि तिबेट दरम्यान, भारताची अनुमती घेता चीनने रस्ता बांधल्यानंतरच त्या युद्धास तोंड फुटलेले होते. त्या महामार्गास आता जी-२१९ म्हणून ओळखले जाते. हा रस्ता बांधल्यानंतर १९५९ साली चीनने प्रथमच ह्या भागावर दावा केलेला होता.

पी.पी.-१४ हा भारताच्या ताब्यातील गलवान खोर्याच्या तोंडातील केवळ एक बिंदू आहे. ह्या बिंदूचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यामुळे चीनच्या बाजूने गलवान शायॉक नद्यांच्या संगमाचे परिदृश्य झाकले जाते. भारताने अलीकडेच ह्या संगमावरच एक पूल बांधलेला आहे. शिवाय ह्या पुलापासून पी.पी.-१४ बिंदूपर्यंत, दारबुक-शायॉक-दौलत बेग ओल्डी मार्गावर जोडरस्ताही बांधलेला आहे. इथली चीनसोबतची प्रत्यक्ष-नियंत्रण-रेषा (एल..सी.-लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल) जमिनीवर आखलेली नाही. गलवान खोरे ह्या रेषेच्या पूर्वेला आहे. गेल्या ५८ वर्षांपासून ते चीनच्याच ताब्यात आहे. पंतप्रधान नेहरूंनी अक्साई चीनबाबत असे म्हटले होते की, तिथे गवताचे पातेही उगवत नाही, म्हणून ते त्यांनी चीनच्या ताब्यात जाऊ दिले होते.

गलवान खोर्याचे महत्त्व

भारताने दारबूक-शायॉक-दौलत बेग ओल्डी रस्ता बांधलेला आहे. हा २५५ किलोमीटर लांब आहे. रसद पुरवठ्याचे दृष्टीने व्यूहरचनात्मक, तसेच दल बदलांकरताही महत्त्वाचा आहे. ह्यामुळे उत्तम निगराणीही करता येते आणि उत्तम प्रतिसादही दिला जाऊ शकतो.

चीनला असे वाटते की, गलवान खोरे वापरून भारत अक्साई चीनच्या बाजूला आक्रमण करेल. पी.पी.-१४ बिंदू त्यांच्याकरताचे थेट परिदृश्य झाकून टाकत असतो. चीनने अक्साई चीनपासून गलवान खोर्यापर्यंत रस्ताही बांधलेला आहे.

१५ जून २०२० चा समरप्रसंग

हा प्रसंग चीनने पी.पी.-१४ बिंदूपर्यंत येण्यासाठी केलेल्या प्रयासामुळे उद्भवला. १० ते १२ जून २०२० दरम्यान त्यांनी ह्या बिंदूच्या खालीच एक तंबूंचे शिबीर उभारले. हे शिबीर भारताने बळाचा वापर करून १२ १३ जून २०२० ला हटवून टाकले. पिपल्स लिबरेशन आर्मी म्हटल्या जाणार्या ह्या चीनी सैन्यास, ह्या कारवाईत जीवितहानीही सोसावी लागली. ह्यामुळे चीनला राग आला आणि १४ जून २०२० रोजी त्यांनी तंबूंचे नवे शिबीर उभे केले. भारतास १५ जून २०२० रोजी ह्याचा शोध लागला आणि ह्याचे पर्यवसान जीवघेण्या लढाईत झाले.

०६ जून २०२० रोजी, वर्तमान स्थितीतून माघार घेण्याबाबत, भारताच्या १४ व्या कॉर्प्सचे आदेशक लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंग आणि चीनच्या दक्षिण झिंझिआंग क्षेत्राचे आदेशक मेजर जनरल लियू लिन ह्यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार १५ जून २०२० पर्यंत, भारताने पश्चिमेकडे . किलोमीटरपर्यंत आणि चीनने पूर्वेकडे . किलोमीटरपर्यंत माघार घेणे अपेक्षित होते.

४-महाराष्ट्र / १६-बिहार मधील एका मेजर हुद्द्याच्या अधिकार्याचे नेतृत्वात १० सैनिकांच्या एका पथकास ह्या वस्तुस्थितीची पडताळणी करण्यास पाठवण्यात आले होते. त्यांना तंबू आढळून आले. त्यांनी ते जाळून टाकले. ते परतत असतांना त्यांना संपूर्णपणे सशस्त्र असलेल्या चीनी सैनिकांनी घेरून ताब्यात घेतले.

१६-बिहारचे आदेशक अधिकारी कर्नल संतोष बाबू ह्यांना हे समजताच त्यांनी, चीनी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी ३० सैनिकांसह घटनास्थळी धाव घेतली. चीनी सैनिक उंचावर होते. भारतीय सैनिक सावकाश वर चढत होते. १६,००० फुटांवर चाल करणे अत्यंत मंदपणे संथच होत असते. कित्येकदा श्वासच कुंठीत होतो. शिवाय रस्ता एवढा अरुंद होता की, एका ओळीतच चालावे लागत होते. एकापाठी एक. ह्याकरताच तर पी.पी.-१४ पर्यंतचा रस्ता बांधण्यात आलेला होता. कर्नल संतोष बाबू ह्यांचे पथक चीनी तंबूंपासून ६० ते १०० मीटर अंतरावर असतांनाच, चीनी सैनिकांनी ओरडून त्यांना गस्तीबद्दल बोलायचे असल्यास एकट्यालाच समोर येण्यास सांगितले. कर्नल संतोष ह्याकरता कबूल झाले. ते दोन सैनिकांसह पुढे सरकू लागले. तिघेही निःशस्त्र होते. ध्वजभेटींकरताच्या शिरस्त्यानुरूपच हे होत होते. सर्व चीनी सैनिकांनी खिळे लावलेल्या गदांनी त्यांच्यावर हल्ला केला. तिघेही जबर जखमी होऊन पडले.

हे पाहून उर्वरित सैनिकांनी ही घटना तळास कळवली आणि चीन्यांवर धावा बोलला. आमोरासमोर लढाई सुरू झाली. चीनी खिळ्यांच्या गदांना प्रत्युत्तर देण्याकरता भारतीयांकडे रायफलवर चढवलेली बायोनेटस होती. अशा प्रकारच्या आमोरासमोर लढाईसाठी भारतीय सैनिक उत्तमरीत्या प्रशिक्षितच असतात.

दरम्यान चीन्यांना ४०० सैनिकांची कुमक प्राप्त झाली. आपल्याही सैनिकांना, १६-बिहार लगतच्या एककांतील २०० सैनिक येऊन मिळाले. हे सैनिक १६-बिहार, -पंजाब, -महाराष्ट्र, -मेड. रेजिमेंट आणि १८१-फिल्ड रेजिमेंटचे होते. १६-बिहारचे इतर भारतीय सैनिक संतप्त झालेले होते. १६-बिहारच्या आदेशकांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी त्यांनी चीन्यांवर आक्रमण केले. इतर बटालिअन्सचेघातक प्लॅटून्ससही येऊन मिळाले. चीनी सैनिक पाठीला पाय लावून पळू लागले. त्यांच्या किमान १८ सैनिकांना कंठस्नान घातले गेले.

१६-बिहारचे संतप्त सैनिक चिनी सैनिकांचे प्राणच हिरावू लागले. चीनी सैनिकांच्या बुलडोझरमुळे ह्या भागदौडीतच एक भूस्खलन घडून आले. अनेक चीनी सैनिक शेकडो फूट खोल, बर्फासारख्या थंडगार गलवान नदीच्या खाईत पडले आणि बहुधा प्राणास मुकले.

१६-बिहारचे लेफ्टनंट कर्नल (उप-आदेशक), कॅप्टन ( वर्षे सेवा), कॅप्टन ( वर्षे सेवा) सर्वात धाडसी होते. त्यांनी त्यांच्या सैनिकांना आदेशकांच्या मृत्यूचा सूड घेण्याकरता भयंकर आवेशाने पुढे नेले. आर्टी. रेजिमेंटच्या एका शिपायाने तर १० चीनी सैनिकांना आपल्या तलवारीनेच यमसदनास पाठवले.

शिखांनी सहा सैनिकांच्या संरक्षणात असलेल्यावरिष्ठ दिसणार्या एका अधिकार्यावर हल्ला चढवला. त्यांनी सहाही सैनिकांना ठार केले आणि वरिष्ठ अधिकार्यास गच्ची धरून रक्तरंजित युद्धात पुढे खेचले. ही लढाई ३० मिनिटे चालली. ते शूरासारखे लढले. चीनी सैनिकांकडूनच हिसकावून घेतलेल्या तलवारींनीच त्यांनी त्यांची कत्तल केली

भारताने कर्नल संतोष बाबू ह्यांचेसहित २० सैनिक गमावल्याचे घोषित केले. चीननेही जबर प्राणहानी सोसली. भारतीय अनुमानांनुसार ही संख्या ४३ होती. हे अनुमान पार्थिवे गोळा करण्यासाठी आलेल्या चक्रपंखींच्या (हेलिकॉप्टरांच्या) खेपांवरून काढण्यात आलेले आहे. हस्तगत झालेल्या अमेरिकन अहवालांनुसार ३५ चीनी मृत झाले असावेत असे दिसते. संभवतः त्यात कर्नल्स आणि मेजर्स ह्यांचाही समावेश आहे. ह्यांत भूस्खलनात दरीत पडून दगावलेल्या सैनिकांचा समावेश नाही. काही अनुमाने चीनी प्राणहानी १२८ ते १५० असल्याचे सांगतात.

१६-बिहारचे सैनिक आक्रमक झाले होते त्या स्थळापासून पळून जाणार्या एका चीनी कर्नलला आणि काही सैनिकांना भारतीय भूदलाच्या -मेडियम रेजिमेंटने, पकडलेही आहे. भारतीय गस्ती पथकातील दहा सैनिकांची मुक्तता आणि चीनी कर्नल त्याच्या सैनिकांची मुक्तता देवाण घेवाणीचा भाग आहेत. चीन्यांनी ह्यातून भारतीय सैनिकांसोबत छेड काढू नये, हा एक धडा शिकला आहे.

सीमा व्यवस्थापनावर १९९३, १९९६ आणि २०१३ साली झालेल्या तीन करारान्वये अंगारधारी शस्त्रे सीमेवर वापरण्यास मनाई आहे. मात्र तलवारीच्या प्रत्यक्ष लढाईतच अधिक प्राणहानी होत आहे.

चीनी आदेशक अधिकार्यास पकडल्याने, १७ १८ जून २०२० रोजी झालेल्या जी..सी. पातळीवरील वाटाघाटींना खूपच वेग येण्यास मदत झाली. ह्याची परिणती १० भारतीय सैनिकांच्या जलद विनिमयात झाली.

पर्यवसान

भारताच्या मध्ययुगीन आणि अर्वाचीन इतिहासात गलवान खोर्याचे युद्ध चीन्यांविरुद्ध सर्वाधिक उग्रतेने लढले गेलेले युद्ध मानले जाईल. १९६२ मध्ये रेझांग-ला येथे युद्ध झाले होते. ह्यात एका कुमाऊं कंपनीने चीनी आक्रमणास रोखले होते. गलवान युद्धातही त्यासारखाच प्रतिसाद चीनी आक्रमणास मिळाला.

तिबेटमधील चीनी जनरलला परिस्थिती असमर्थपणे हाताळल्याखातर काढून टाकण्यात आलेले आहे. चीन्यांना भारतीय सैनिकांकडून कडवा प्रतिकार होण्याची अपेक्षाच नव्हती. भारतीय सैनिक आदेशक अधिकार्यास देवासमानच मानतात. त्यास इजा झाली तर किंवा तो मारला गेला तर ते सूड घेण्यास धावून जातात. चीन्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसांनी, गलवान खोर्यात हेच घडले.

भारतीय सैनिकांच्या शूरतेचा प्रभाव काही काळ निश्चितच राहील. मात्र चीन्यांसोबतची ही लढाई दीर्घकाळ चालेल. क्रूर कर्म, प्रदीर्घ वाटाघाटी आणि मनोबळाचे युद्ध. भारतास चीनसोबतच्या दीर्घकालीन युद्धाकरता सज्ज राहिले पाहिजे. सर्व भारतीयांनी ह्यात सहभागी व्हावे. प्रचाराच्या युद्धास बळी पडता कामा नये. सर्व चीनी सामानावर बहिष्कार घालावा. ह्यामुळेच लडाखमधील चीनी आक्रमकता कमी होईल.

१५ १६ जूनला शौर्य गाजवलेल्या वीरांचे देशाने यथोचित स्मरण ठेवावे. खूप मोठ्या आणि उत्तमरीत्या सुसज्जित चीनी सैन्याविरुद्ध त्यांनी प्रखर धैर्य दाखवून दिलेले आहे.

मूळ इंग्रजी लेखः


THE GALWAN BATTLE OF NIGHT 15/16 JUNE  

This article is based upon information received from many friends in the army.In the fog of war, a lot of misinformation flies. Ill-informed but self styled defence experts and politicians always push through narratives which are not true . Some of these experts(???) had never ever seen high altitude terrain in their entire life or service careers. But they must appear on TV channels to narrate lies . This is what had happened in a fight  that took place between Indian and Chinese troops in Galwan valley  Eastern Ladakh on 15/16 June 2020.

The Galwan River Valley was the flash point of 1962 war. In its 1959 claim line China had claimed the entire valley upto confluence of Shyok River and Galwan River . The Valley became a flashpoint after China constructed a road between Xinjiang and Tibet, without India's consent. The highway is now known as G219. After building the road, the Chinese lay a claim to the area, first in 1959.

PP-14 is only point in the mouth of Galwan valley that India controls. The significance of this PP-14 is that it screens Chinese look into Shyok River confluence with Galwan River . India has recently built a bridge over this confluence . Besides , a Link Road to PP-14 is being constructed from this bridge on the DSDBO Road. LAC/ border with China is not marked on ground. Galwan valley had been on the Eastern side of LAC , which is under Chinese control for last 58 years. PM  Nehru had said of Aksai Chin that he had surrendered it BECAUSE: NOT A BLADE OF  GROWS  THERE.

The significance of Galwan valley

India had constructed a road to DBO from Shyok and Darbuk. It is 255 KMs long  and it has strategic importance of logistics support and also switching of forces, BETTER SURVEILLENCE BETTER REACTION. Chinese think that India could launch an offensive towards Aksai Chin using Galwan Valley. PP-14 obstructs their direct view. China has built a road from Aksai Chin to this valley.

Crisis of 15 June 2020

The present crisis of 15 June 2020 was due to Chinese attempt to come upto PP-14. They had created a tented camp below it ON 10-12 June 2020. This camp was forcibly removed by India on 12/13 June 2020. Some fatalities were suffered by PLA in this action.. This  had enraged the Chinese and again by 14 June 2020, they set up a fresh tented camp. This was detected by India on 15 June 2020 and it led to a deadly FIGHT.

On 06 June 2020 , an agreement was reached between the Chinese and Indian commanders (Major  General Liyu Lin Commander af South Xinjiang Theatre of China and Lt Gen Harinder Singh of 14 Corps of India) to withdraw from present locations. India was to fall back 1.5 KM Westward and China by 2.5 KMs Eastward. ThIS was to be completed by 15 June 2020.

A patrol of 10 men under a Major from 4 Mahar / 16 Bihar was sent to ascertain  this fact. They found the tent and burnt it . As they were returning they were surrounded and captured because Chinese were fully armed.

As soon as CO 16 Bihar, Col Santosh Babu learnt this , he rushed to the spot with 30 men to negotiate. Chinese were on a higher ground and Indian patrol party was slowly climbing . At 16000 feet, the foot movement is very sluggish and slow. One loses breath, Also the track was so narrow that one could only move in a single file, one man behind the other. This is why the road to PP-14,was constructed. As the Col Santosh‘s party was some 60-100 meters from Chinese tent, they shouted at him to come alone if he wanted to negotiate about the patrol. Col Santosh agreed and moved up with 2 Men THE CO and his two men were unarmed, as is the norm in all flag meetings. THE CO and his men were, attacked with nailed Clubs by the chinese and all three fell badly wounded.

Seeing this rest of the CO party radioed it to the base and charged towards the Chinese . A hand to hand fight began. Indians had bayonets charged to rifles as an answer to Chinese nailed Clubs and Iron rods. Indians soldiers are well trained in Close combat and bayonet fighting.

In the meanwhile, Chinese reinforcements of 400 men joined but so did 200 men from 16 Bihar and adjoining units. The troops were 16 Bihar, 3 Punjab, 4 Mahar, 3 Med Regt and 181 Field Regt. 16 Bihar men and other Indian troops went berserk and attacked the chinese to avenge CO 16 Bihars death. The Ghatak platoons (Commandos) of other battalions had joined in. Chinese were running halter smelter.Minimum of 18 PLA soldiers necks were snapped.

16 Bihar men WENT berserk  blasting the life  out of PLA soldiers. In this melee Chinese Buldozer caused a land slide and with it many PLA Soldiers went hundreds of feet into the icy Cold  River Galwan and probably died.

LT COL  -- (2ic) ,Capt  -- (3yrs SERVICE), Capt --   (2yrs) of 16 Bihar were the most daring and they ferociously led their troops to avenge the death of their CO. Another soldier of Arty regiment, Sepoy -- killed 10 PLA Soldiers with his sword.

The Sikhs, attacked a ‘senior looking officer‘ protecting by six Chinese guards.“They killed all the six guards and dragged  the senior officer by the scruff of his neck in a bloody fight lasting for 30 minutes.” They fought like men possessed, smashing Chinese heads with rocks and slashing them with swords snatched from the Chinese.” 

India declared 20 dead including Col Santosh Babu,  China too, suffered heavy casualties. Indian estimates put the Chinese casualties at 43. This IS estimated from the helicopter trips coming to collect the casualties. American report from intercepts suggests that there were 35 dead , possibly a few officers including Cols and Majors. This does not include the soldiers who went down in the river when land slide took place . Some estimates say that China suffered between 128 to 150 casualties .

3 Medium Regiment of Indian Army, had captured a Chinese Colonel and few men who were running away from the scene of action where 16 BIhar soldiers had gone aggressive . The release of 10 men of Indian patrol is a give and take of this Chinese Col and his men. Chinese definitely learnt a lesson so as not to mess with Indian soldiers.

Three treaties on Border Management in 1993, 1996 and 2013 prohibits the use of fire arms on the border. There are more casualties due to physical fights with swords.

Capture of Chinese  Commanding Officer greatly helped fast tracking of GOC level negotiations held between the two sides on 17/18 Jun, leading to quick exchange of 10 Indians .

The Aftermath

Down India’s medieval and modern military history , the battle of Galwan Valley will rank among the most fiercely fought battles against the Chinese. In1962  battle was fought at Rezang la in which a company of Kumaun did not let the Chinese advance. Galwan battle had a similar effect on the Chinese action.

The Chinese general in Tibet has been sacked because office incompetent handling of situation. The Chinese never expected fierce reaction from the Indian soldiers. The Indian soldiers value the commanding officer like God and if he is if he is is hurt OR  killed they will go all out to take a revenge. This is what happened in the Galwan Valley two days later the Chinese decided to withdraw.

The effect of the Indian soldiers bravery will definitely last for some time, however the fight with the Chinese is going to be a long drawn up a affair of crookedness , long negotiations and psychological war. India has to be ready for a long drawn war with China.All the Indians SHOULD contribute to the battle against China by not falling prey to their propaganda war and also carrying out a complete boycott of the Chinese goods. This will reduce the Chinese aggressiveness in Ladakh.

A grateful nation must honour the Galwan Heroes of Night 15/16 June. Their raw courage displayed against a much larger and well prepared Chinese army.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.