२०२५-०१-११

गीतानुवाद-३०७: धीरे धीरे मचल ऐ

मूळ हिंदी गीतः कैफी आझमी, संगीतः हेमंतकुमार, गायकः लता
चित्रपटः अनुपमा, सालः १९६६, भूमिकाः सुरेखा, तरूण बोस 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०१११


धृ

धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेकरार
कोई आता है
यूँ तडप के ना तडपा मुझे बार बार
कोई आता है

हळू हळूच उसळ ए मना दुर्निवार
कोणी येतो आहे
तळमळून तू नको जागवू वारंवार
कोणी येतो आहे

उसके दामन की खुशबू हवाओं में है
उसके कदमों की आहट फजाओं में है
मुझको करने दे, करने दे, सोलह सिंगार

त्याच्या वस्त्रांचा गंधच हवेवर आहे
पदरवाचीही चाहूल रवांवर आहे
मला होऊ दे होऊ दे पुरती तयार

मुझको छूने लगी उसकी परछाईयाँ
दिल के नजदीक बजती हैं शहनाईयाँ
मेरे सपनों के आँगन मे गाता है प्यार

मला स्पर्शू बघे त्याची छाया इथे
हृदयाशी या सनई का ही गुंजते
अंगणी माझ्या स्वप्नात गाते प्रीती

रूठ के पहले जी भर सताऊँगी मैं
जब मनायेंगे वो, मान जाऊँगी मैं
दिल पे रहता है ऐसे में कब इख्तियार

रुसून आधी मनभर मी देईन त्रास
मनधरणीस लागेल तर मानेन त्या
अशा वेळी मनावर का राहतो ताबा