२०२५-११-१५

गीतानुवाद-३१८: कौन है जो सपनों में आया

मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर-जयकिसन, गायकः मोहम्मद रफी
चित्रपटः झुक गया आसमान, सालः १९६८, भूमिकाः राजेंद्रकुमार, सायरा बानू 

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१५०८१७


धृ

कौन है जो सपनों में आया
कौन है जो दिल में समाया
लो झुक गया आसमान भी
इष्क मेरा रंग लाया
ओ प्रिया .....  ओ प्रिया ..... 

कोण ती जी स्वप्नात आली
कोण ती जी मनी सामावली
झुकले पाहा आकाश हेही
पहा साधले प्रेमाने हेही
ए प्रिये .....  ए प्रिये .....

जिंदगी के हर एक मोड पे मैं
गीत गाता चला जा रहा हूँ
बेखुदी का ये आलम ना पुछो
मंझिलों से बढा जा रहा हूँ

जीवनाच्या वळणावर हरेक
गीत गातच असा चाललो मी
धुंद इतकी की विचारूच नका
थांबे ओलांडतच चाललो मी

सज गयी आज सारी दिशाएं
खुल गयी आज जन्नत की राहें
हुस्न जब से मेरा हो गया है
मूझ पे पडती है सब की निगाहे

आज सजल्यात सार्‍या दिशाही
मार्ग स्वर्गाचे झालेत खुलेही
लाभली मजसी जव सुंदरी ही
सर्व माझ्याकडेची पहाती

जिस्म को मौत आती है लेकिन
रूह को मौत आती नहीं है
इश्क रोशन है, रोशन रहेगा
रोशनी इस की जाती नहीं है

मृत्यू शरीरास येतो परंतू
मृत्यू आत्म्यास ना ये कधीही
प्रेम तेजस असे, राहील तेजस
तेज त्याचे न घटते मुळिही 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.