मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः लता
चित्रपटः बरसात, सालः १९४९, भूमिकाः राज कपूर, नर्गिस,
निम्मी, प्रेमनाथ, कक्कू
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०४१८
|
धृ
|
पतली कमर है तिरछी नज़र है खिले फूल सी तेरी जवानी कोई बताये कहाँ क़सर है ओ, आजा
मेरे मन चाहे बालम आजा तेरा आँखों में घर है
|
सिंहकटी तू तिरपी नजर तू फुलापरी तव यौवन खुलले कुणीही सांगा कुठे कसर आहे ओ, येरे माझ्या प्रिय राजसा या डोळ्यांतच तुझे घर आहे
|
|
१
|
मैं चंचल मद्मस्त पवन हूँ झूम झूम हर कली को चुमूँ बिछड़ गयी मैं घायल हिरणी तुमको ढूँढूँ बन बन घूमूँ मेरी ज़िंदगी मस्त सफ़र है
|
मी चंचल मस्त पवन आहे उडत बागडत हर कळीस चुंबू विलग जाहले जखमी मी हरणी तुला शोधतच वनीवनी फिरू मी जीवन माझे मस्त प्रवाहच
|
|
२
|
तुम बिन नैनों की बरसातें रोक न पाऊँ लाख मनाऊँ मैं बहते दरिया का पानी खेल किनारों से बढ़ जाऊँ बँध न पाऊँ नया नगर नित नयी डगर है
|
तुजविण नेत्रांची वर्षा हो रोखू न शकते लाख प्रयासे मी ओघवत्या नदीचे पाणी खेळत किनार्यांशी मी जाऊ न बद्ध होऊ नवे नगर नित नवा पंथही
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.