मूळ हिंदी गीतः हसरत जयपुरी, संगीतः शंकर जयकिसन, गायकः मोहम्मद
रफी
चित्रपटः बरसात, सालः १९४९, भूमिकाः राज कपूर, नर्गिस,
निम्मी, प्रेमनाथ, कक्कू
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०२५०४१८
|
धृ
|
मैं ज़िंदगी में हरदम रोता ही रहा हूँ रोता ही रहा हूँ तड़पता ही रहा हूँ
|
मी जीवनात नेहमी रडरडत राहिलो रडरडत राहिलो तळमळतच राहिलो
|
|
१
|
उम्मीद के दिये बुझे दिल में है अंधेरा जीवन का साथी न बना कोई भी मेरा फिर किसके लिये आज मैं जीता ही रहा हूँ
|
आशेचे दिवे विझले मनात आहे अंधेरा जीवनसाथी न कोणी माझा कधी झाला मग कुणासाठी आज जगतच मी राहिलो
|
|
२
|
रह-रह के हँसा है मेरी हालत पे ज़माना क्या दुख है मुझे ये तो किसी ने भी न जाना ख़ामोश मोहब्बत लिये फिरता ही रहा हूँ
|
राहून राहून हसला माझ्यावर हा जमाना काय दुःख आहे मला कुणीही न उमजला गुपचुप प्रेमाकरता फिरतच मी राहिलो
|
|
३
|
आई न मुझे रास मोहब्बत की फिज़ायें शरमाई मेरी आँख से सावन की घटाएं लहरों में सदा ग़म को बहाता ही रहा हूँ
|
आली न पसंतीस ही बहारही माझ्या वर्षेतली बरसातही मम अश्रूंस लाजली लहरींवरी मी सोडले माझे दुःख सदाची
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या
जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या
वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या
गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या
- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४
.